आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP: गोहत्‍या कबुलीसाठी दबाव, व्हिडिओ आला समोर; समयुद्दीन यांची झाली होती हत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हापुड - उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन ठार केेले आणि दुसऱ्यास गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ शनिवारी समोर आला. यात जमावाने समयुद्दीन (६५)या व्यक्तीस बेदम मारहाण केली आहे. त्याच्यावर गोहत्या केल्याचा आरोप मान्य करण्यास दबाव टाकण्यात आल्याचे व्हिडिओत दिसते. सुमारे एक मिनिटाचा हा व्हिडिओ असून समयुद्दीन वारंवार आपण गोहत्या केली नसल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या सांगण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. ही घटना हापुड जिल्ह्यातील पिलखुवा भागात असलेल्या बाछेदा गावातील आहे. या घटनेचा व्हिडिओ १८ जून रोजीही समोर आला होता. मात्र, मोटारसायकलच्या धडकेवरुन ही भांडणे झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचा गोहत्येशी काही संबंध नाही, असे पोलिस सांगतात.

बातम्या आणखी आहेत...