आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या बडगाम पोलिस तुकडीवर फायरिंग, एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - बडगाममध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर फायरिंग केले. त्यानंतर त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये एका दहशतवाद्याला पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमक अजूनही सुरू आहे. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार बडगामच्या जुहामामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर हा हल्ला केला. 


31 डिसेंबरला CRPF कॅम्पवर केला होता हल्ला 
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर 31 डिसेंबरला दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात 3 कॅप्टनसह 5 जण शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. 


वाढदिवशी शहीद झाला होता BSF जवान
3 डिसेंबरला सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल आरपी हाजरा शहीद झाले होते. त्याचदिवशी त्यांचा वाढदिवसही होता. त्यांच्या कुटुंबात 18 वर्षांचा एक मुलगा आणि 21 वर्षांची मुलगी आहे. 


2017 मध्ये 206 दहशतवाद्यांना कंठस्नान 
2017 मध्ये सिक्युरिटी फोर्सेसने जम्मू आणि काश्मीरमध्ये 206 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. J&K पोलिसांचे प्रमुख एसपी वैद म्हणाले होते की, आम्ही ऑपरेशन केवळ दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी नव्हे तर त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठीही राबवले होते. आम्ही 75 तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...