आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळ्यामध्ये इतर बँकांचीही चौकशी;एसबीआयसह 5 बँक अधिका-यांवर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यात तपास संस्थांनी एसबीआय, अलाहाबाद बँक, युनियन बँक, युको आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँग शाखांतील अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. या शाखांमधून बोगस एलओयूच्या (लेटर ऑफ अंडरस्टँडिंग) आधारे नीरव मोदी, मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना कर्ज दिले गेले.


रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जेम्स-ज्वेलरी क्षेत्रासाठी एलओयूची मर्यादा ९० दिवसांची असते. मात्र, पीएनबी अधिकाऱ्यांनी हे एलओयू ३६५ दिवसांसाठी जारी केले. याकडे इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. हाँगकाँगमध्ये ११ भारतीय बँकांच्या शाखा आहेत.

 

१५ शहरांत ४५ छापे
ईडीने रविवारी १५ शहरांत नीरव मोदी, मेहुल चौकसी यांच्याशी संबंधित ४५ ठिकाणी छापे टाकले. यापूर्वी शुक्रवारी ३५ तर शनिवारी २१ ठिकाणी छापे टाकले होते. शनिवारपर्यंत ५,६७४ कोटी रुपयांचे हिरे, सोने आणि दागिने जप्त केले आहेत.