आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावतच्य स्क्रीनिंगवर करणी सेनेचा नवीन इशारा; म्हणाले, फक्त 25 तारखेची वाट बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - वादग्रस्त चित्रपट पद्मावतच्या प्रदर्शनासाठी 25 तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, करणी सेनेने आता या रिलीझवर नवीन धमकीवजा इशारा दिला आहे. करणी सेनेच्या सदस्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया 25 तारखेला करून देणार असे उत्तर दिले आहे. करणी सेनेचे पदाधिकारी म्हणाले, "वाट बघा आणि पाहा 25 तारखेला काय होते ते." संघटनेचे सदस्य गुडगावमध्ये चित्रपट प्रदर्शित करू नये असे निवेदन देण्यासाठी गेले होते. 

 

- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट पद्मावतला विरोध आणि धमक्या मिळत असल्याने निर्माता संजय लीला भंसाळी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तरीही चित्रपट बाजाराचा कल आणि प्रदर्शनासाठी दर्शकांचा कुतूहल सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. 
- दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रनवीर सिंह स्टारर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा सरकारने आधीच बंदी लावली आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी हटवली तरीही हे राज्य आपल्याकडे पद्मावत दाखवणार नाहीत. 
- सिनेमा ओनर्स अॅन्ड एक्झिबिटर्स असोसिएशन (COEA) चे माजी अध्यक्ष आणि सदस्य नितीन धर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "देशातील काही भागांत चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचणी येऊ शकतात. आम्ही एक्झिबिटर्सला विनंती करून सल्ला दिला की आपल्या थिएटरच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घ्यावी."
- यासंदर्भात त्यांनी गृहमंत्रालयास सुद्धा पत्र लिहून सुरक्षा बंदोबस्ताची मागणी केली आहे. यासोबतच प्रत्येक थिएटर मालकाने आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच प्रदर्शनाचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.