आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​नियंत्रण रेषेवर चकमकीत पाकच्या 3 जवानांचा खात्मा;चाेख प्रत्युत्तर, एक भारतीय जवान शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- युद्धबंदीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकच्या सैनिकांना गुरुवारी भारतीय जवानांनी धडा शिकवला. गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी तीन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. त्यांच्या चार छावण्याही उद्ध्वस्त केल्या. या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला. बुधवारपासून सुरू असलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. एक लहान मुलगीही ठार झाली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी हद्दीत असलेल्या छावण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान मारले गेले असल्याचे वृत्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...