आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Attack On Patrol Party In Keran Sector Of Kashmir Jawan Injoured News And Updates

राजनाथ यांच्या दौऱ्यादरम्यान LOCवर दहशतवाद्यांचा पेट्रोलिंग टीमवर हल्ला, 2 जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये लाइन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर हल्ला केला, यात दोन जवान जखमी झाले आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. गृहमंत्री राजनाथसिंह दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी हा हल्ला झाला आहे. राजनाथ सिंह हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंबंधी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींसोबत चर्चा करणार आहेत. 


गेल्यावर्षी जूनमध्ये बॅटने केला होता हल्ला 
- गेल्यावर्षी जूनमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) काश्मीरच्या पूंछ भागात सीमेपासून 600 मीटर आत घुसून सैन्याच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला केला होता. हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला होता. 
- तेव्हा एका अधिकाऱ्याने सांगितले होते, '22 जून रोजी बॅटचा एक घुसखोराला ठार करण्यात आले होते. त्याची बॉडी लोकल पोलिसांना सुपूर्द करण्यात आली होती. आम्हाला विश्वास आहे की आणखी एक दहशतवादी मारला गेला होता, मात्र त्याचा मृतदेह दहशतवादी सोबत घेऊन गेले होते.'
- 'ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्रसाठा आणि युद्धासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषतः एक खास प्रकारचा चाकू, डोक्याला बांधला जाणारा कॅमेरा, एके-47, 3 मॅगजीन, 2 ग्रेनेड सापडले होते.'

बातम्या आणखी आहेत...