आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिकानेर - सीमा भागातील तरुणांना चिथावण्याचे काम पाकिस्तान करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता गुप्तहेर संस्थेद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पाकिस्तान तरुणांना चिथावत आहे.
सुरतगड छावणीजवळील निरवाणा व सादकवाली जोहडी गावांमध्ये कसून चौकशी सुरू आहे. या गावांतील अनेक तरुण या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सक्रिय आहेत. ग्रुप चालवणाऱ्या अॅडमिनचे क्रमांक पाकमधील आहेत. या क्रमांकांची पडताळणी करण्यात येत आहे. या ग्रुपवर ५०० पेक्षा अधिक व्हॉइस मेसेज येतात.
४-५ वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून येथिल नागरिकांच्या संपर्कात राहण्याचे प्रयत्न पाकने केले होते. यामध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय भारतीय गुप्तहेर संस्थेला आहे. काही दिवसांपूर्वीपासून श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड छावणीच्या आसपासच्या नागरिकांना पाकिस्तानी लोक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करत आहेत. या ग्रुपवर भारताविरुद्ध चिथावणीखोर मजकूर व मोठी भाषणेही टाकली जातात.
रोहिंग्यांविषयी आक्षेपार्ह संदेश : रोहिंग्या मुसलमानांवर झालेल्या अत्याचारासंंबंधी आक्षेपार्ह मजकूर ग्रुपवर पोस्ट करण्यात आला. त्यावर पोलिसांची सोशल मीडियावर निगराणी आहे, असे पाेलिसांकडून सांगण्यात अाले.
भारतीय तरुण ग्रुप सोडतात; पण...
अनेक भारतीय तरुण व्हॉट्सअॅप ग्रुप सोडून देतात. मात्र, त्यांचे क्रमांक वारंवार यात घेतले जात आहेत. पाकिस्तानी तरुण संदेशामध्ये अनेकदा भारतीयांना शिव्याही देतात. या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे उमर साहब, एल अशी आहेत. सर्वाधिक चिथावणीखोर संदेश ‘एल’ नामक ग्रुपवरच पोस्ट केले जात असून त्यांचे क्रमांक पाकमधीलच हस्तकांना कसे कळले, याविषयी ते अनभिज्ञ आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.