आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दिवसांनंतरही पाककडून Firing सुरूच; आतापर्यंत 11 मृत्यू, 1 लाख शिबीरांमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - सीमेवर पाकिस्तानकडून 10 व्या दिवशीही गोळीबार थांबलेला नाही. या गोळीबारात आतापर्यंत 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच 60 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्स आणि सैनिकांकडून फायरिंग सुरू असताना उखडी तोफांचे हल्ले सुद्धा केले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका अरनिया, कठुआ,     सांबा आणि जम्मूच्या 120 हून अधिक गावांना बसला आहे. सलगच्या गोळीबारामुळे 1 लाख नागरिक शिबीरांमध्ये राहण्यासाठी मजबूर आहेत. 


बुधवारी थांबलेली फायरिंग रात्री पुन्हा सुरू
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी शांतता होती. दुपारपर्यंत पाककडून होणारा गोळीबार तांबला होता. परंतु, रात्री 11 वाजता उरीच्या कमलकोटे आणि राजौरीच्या काही भादांमध्ये पुन्हा पाकने फायरिंग सुरू केली. यात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 

200 हून अधिक शाळा 6 दिवसांपासून बंद
पाककडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमेलगत असलेल्या 120 गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील मजुर आणि दैनंदिन काम करून खाणाऱ्यांचे हाल आहेत. सर्वत्र भयाण शांतता आहे. अनेक लोक आपल्या घरातून इतरत्र रवाना झाले. तर 1 लाखांहून अधिक नागरिक शिबीरांमध्ये राहत आहेत. मोर्टार हल्ल्यांमुळे गावकऱ्यांची घरे कोसळली आहेत. या गावांमध्ये एकूण 200 हून अधिक शाळा गेल्या 6 दिवसांपासून बंद आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सीमेवर नागरिकांचे हाल, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...