आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर सीमेवर युद्धजन्य स्थिती : Pakच्या फायरिंगमध्ये 2 ठार, 40 हजार लोकांचे स्थलांतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 मेपासून पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. - Divya Marathi
16 मेपासून पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.

- प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक बंकर उध्वस्त 

- पाक रेंजर 80 ते 120 एमएमच्या मोर्टारद्वारे फायरिंग करत आहेत 

 

जम्मू - पाकिस्तानने बुधवारी सकाळी कठुआच्या हिरानगर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराने मंगळवारीही जम्मू परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेला लागून अशलेल्या वस्त्या आणि लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले होते. त्यात 20 जण जखमी झाले होते. पाकिस्तान आरएसपुरा, अरनिया, रामगड, सांबा आणि हिरानगरमध्ये आठ दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. बीएसएफ त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. असे सांगितले जात आहे की, सीमेवर सध्या युद्धजन्य स्थिती आहे. सीमेला लागून असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 


40 हजार लोकांचे स्थलांतर 
न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंगमुळे सुमारे 40 हजार लोकांनी घर सोडून स्थलांतर केले आहे. सरकारने त्यार केलेल्या शिबिरांमध्ये किंवा नातेवाईकांच्या घरात ते राहत आहेत. या परिसरातील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. 


मोर्टार-बॉम्बहल्ले करत आहेत पाक रेंजर्स 
- पुलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्स मोर्टार आणि बॉम्बने अंधाधुंद फायरिंग करत आहेत. अॅटोमॅटिक आणि लहान शस्त्रांचा वापरही केला जात आहेत. 
- ते म्हणाले की, पाकिस्तानकडून वस्त्यांवर 80 एमएम ते 120 एमएम पर्यंतच्या मोर्टारचे हल्ले केले जात आहेत. 


अनेक पाक रेंजर्सही जखमी 
- पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, बीएसएफ पाकच्या लष्कराला सडेतोड उत्तर देत आहे. त्यांचे अनेक बंकर उध्वस्त करण्यात आले आहेत. पाकचे काही रेंजर्सही गंभीर जखमी झाले आहेत. 
- एका अधिकाऱ्याने न्यूज एजन्सीला सांगितले की, पाकिस्तानच्या जखमी रेंजर्सपैकी एकाला लाहोरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर इतर ठिकाणीही काही जणांवर उपचार सुरू आहे. 


राजनाथ जवानांना म्हणाले, निर्णय तुमचाच 
- मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या फायरिंगचा निषेध केला होता. 
- बीएसएफच्या एखा कार्यक्रमात ते म्हणाले होते की, आपण आधी शेजाऱ्यावर गोळी चालवायची नाही. पण तिकडून जर गोळी चालवण्यात आली तर काय करायचे याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...