आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Violates Ceasefire In Keri Battalion Area Along Kashmir Border, 3 Soldiers Killed

भंडाऱ्याचे मेजर मोहारकर जम्मू-काश्मीरमध्ये शहीद; पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेजर प्रफुल्ल अंबादास मोहारकर - Divya Marathi
मेजर प्रफुल्ल अंबादास मोहारकर

जम्मू-  जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भयंकर गोळीबारात १२० इन्फन्ट्रीच्या एका मेजरसह तीन भारतीय जवान शहीद झाले. यात मूळ महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले मेजर प्रफुल्ल अंबादास मोहारकर (३२) यांचा समावेश आहे. केरी सेक्टरमध्ये बरत गला भागात असलेल्या भारतीय चौकींवर पाकिस्तानी सैनिकांनी हा गोळीबार केला. यात मेजर मोहारकर यांच्यासह अमृतसर येथील लान्स लायक गुरमेलसिंग (३४) आणि हरियाणातील कर्नाटल येथील रहिवासी परगटसिंग (३०) शहीद झाले. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. 

 

पुढील स्लाईडवर...इतर शहिदांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...