आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिजसाेबत सभेत उपस्थित पाकमधील पॅलेस्टिनी राजदूतांना माघारी बोलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/रामल्ला- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्या रावळपिंडीतील एका सभेत राजदूताने हजेरी लावल्यावरून भारताने पॅलेस्टाइन सरकारकडे तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. दहशतवाद्यांच्या म्होरक्याने आयोजित केलेल्या व्यासपीठावर आपल्या राजदूताची हजेरी अयोग्य असल्याचे भारताने म्हटले. त्यावर तत्काळ कारवाई करत पॅलेस्टाइनने त्यांच्या राजदूताला परत बोलावले आहे. तसेच झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.  


रावळपिंडीच्या लियाकत बागमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली हे हाफिज सईदच्या शेजारी बसलेले छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल होताच भारताने या कृतीवर आक्षेप घेत नाराजी कळवली. ही बाब कदापिही स्वीकारली जाऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले. सईदवर बंदी असतानाही त्याच्या कार्यक्रमात पॅलेस्टाइनच्या राजदूताने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेने एकतर्फी जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवणारा ठराव संयुक्त राष्ट्राच्या पटलावर मांडण्यात आला होता. भारताने अमेरिकेच्या विरोधात मत टाकले होते. त्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाइनच्या राजदूताला रावळपिंडीतील सभेला आमंत्रित करून भारताला फटकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरे तर भारताने गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाइनच्या बाजूने मत दिले. भारताचे मत घनिष्ठ मित्र असलेला इस्रायल व अमेरिकेच्या विरोधात होते. त्यानंतरही पॅलेस्टाइनकडून भारताच्या विरोधात ही कृती करण्यात आली आहे. दरम्यान, पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी याच वर्षी सुरुवातीला भारताचा दौरा केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील काही महिन्यांत पॅलेस्टाइनचा दौरा करण्याची शक्यता आहे. 

 

दहशतवादाविरोधात भारतासोबत
हे प्रकरण पॅलेस्टाइनने गांभीर्याने घेतले आहे. भारतासोबतच्या संबंधांच्या मूल्याची पॅलेस्टाइनला जाणीव आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत पॅलेस्टाइन नेहमीच भारतासोबत राहील, असे पॅलेस्टाइनच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले.

 

‘दिफा-ए-पाकिस्तान काैन्सिल’ची सभा

हाफिज सईदने पाकिस्तानातील सर्व धार्मिक, कट्टरवादी गटांची शिखर संघटना स्थापन केली आहे. त्याची पहिली सभा शुक्रवारी रावळपिंडीत झाली. दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिल असे या संघटनेचे नाव आहे. ४० गटांना एकत्र करण्यात आले आहे. जेरुसलेमच्या पाठिंब्यासाठी व इस्रायलच्या विरोधात सर्व मुस्लिम समुदायाला एकत्र आणण्यासाठी सईदने शुक्रवारची सभा आयोजित केली होती.

 

भारताचे म्हणणे काय?
न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी मिडिया ब्रीफिंगदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की, आम्ही याबाबत रिपोर्ट पाहिला आहे. आम्ही हे प्रकरण नवी दिल्लीतील पॅलेस्टाइनचे राजदूत आणि पॅलेस्टाइनच्या सरकारसमोर उचलणार आहोत. पॅलेस्टाइनचे हे पाऊल केवळ भारताच्या हितांकडे दुर्लक्ष करणारेच नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित केलेल्या एका दहशतवाद्याचा खुलेआम समर्थन देणारे आहे, असे भारताचे मत आहे. 


इस्रायलने काय म्हटले.. 
इस्रायलनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, इस्रायलच्या दुतावासातील पब्लिक डिप्लोमसीच्या प्रमुख फ्रोइम दित्जा यांनी ट्विटरवर लिहिले, राजदुतांबरोबर किती 'चार्मिंग' कंपनी आहे. 


येरूसलेमवर भारताने दिली होती पॅलेस्टाइनला साथ 
- डिसेंबरच्या पहिल्या आठवज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करत येरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केले होते. अमेरिका त्यांचे दुतावास कार्यालय तेल अवीवमधून या पवित्र शहरात नेणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. अमेरिकेने जगात कायम शांततेच्या मार्गाचा अवलंब केला आहे. भविष्यातही तेच होईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले. 
- त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले होते, पॅलेस्टाइनबाबत भारताचे स्वतंत्र मत आहे. याचा निर्णय आमच्या हितसंबंधांनुसार आणि विचारानुसारच केला जाईल. इतर कोणीही याबाबत निर्णय घेऊ शकणार नाही. 
- त्यानंतर यूएनजीएमध्ये ठराव आणण्यात आला. भारतासह 128 देशांनी युनायटेड नेशन्स जनरल असेंबली (UNGA)मध्ये येरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. 128 देशांनी विरोधाच्या ठरावाचे समर्थन केले तर 9 देशांनी विरोधात मतदान केले. तर 35 देशांनी दुरावा कायम ठेवला. 

बातम्या आणखी आहेत...