आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Wants To Know What Rahul Gandhis 4 Ruling Generations Did For Nation, Amit Shah

राहुल भाजपच्या 4 वर्षांची कामे विचारतात, जनतेला 4 पिढ्यांचा हिशोब हवा -अमित शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही जनतेला जबाबदार आहोत, जनतेलाच पै-पैचा हिशोब देऊन -अमित शहा - Divya Marathi
आम्ही जनतेला जबाबदार आहोत, जनतेलाच पै-पैचा हिशोब देऊन -अमित शहा

सरगुजा (छत्तिसगड) - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी छत्तिसगड दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. भाजपने गेली 4 वर्षे सत्तेत राहून कोणती कामे केली हे विचारू नये. प्रत्यक्षात राहुल यांच्या 4 पिढ्यांनी सत्तेवर राहून नेमके काय केले त्याचा हिशोब जनतेला हवा असे अमित शहा म्हणाले आहेत. 55 वर्षे सत्तेत राहूनही भारताचा विकास कसा झाला नाही असा जाबही शहा यांनी विचारला आहे. मोदी सरकारची 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते विकास यात्रा करत आहेत. याच स्वरुपाची 


'आम्ही जनतेला हिशोब देऊ'
छत्तिसगडच्या सरगुजामध्ये विकास यात्रा कार्यक्रमात अमित शहा म्हणाले, "आम्हाला जनतेने सत्तेवर बसवले आहे. आम्ही त्यांनाच जबाबदार आहोत. आम्ही काँग्रेसला हिशोब देण्याची काहीच गरज नाही. जेव्हा आम्ही जनतेसमोर मत मागायला जाऊ तेव्हा पै-पै चा हिशोब देऊ. भाजप असा एक पक्ष आहे, जो निवडणुकीपूर्वीच जनतेकडे जाते." 


'मोदी सरकारमध्ये देश सुरक्षित'
"मोदी सरकारमध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेत. आधी पाकिस्तान दिवस-रात्र भारतावर हल्ले करायचा. पण, या सरकारमध्ये जवानांनी सर्जिकल स्ट्राइक केले. भारत मातेचा जयघोष करत परत आले. साऱ्या जगात भारताला एक वेगळी ओळख मिळाली."


'काँग्रेसला छत्तिसगडमधून उखडून फेकू'
शहा पुढे म्हणाले, "या सभेत लोकांची उपस्थिती आणि गर्दी पाहता छत्तिसगडमध्ये रमन सिंह यांची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. छत्तिसगडमधून काँग्रेसने उखडून फेकले जाईल. इतका प्रचंड विजय मिळेल की विरोधकांची छाती दबेल. भाजपसारखा दम कुणातच नाही. हा पक्ष निवडणुकीपूर्वीच जनतेमध्ये जाऊन हिशोब देणारा पक्ष आहे."


रमन सिंह म्हणाले, काँग्रेसने काहीच केले नाही
रमन सिंह म्हणाले, काँग्रेस सुद्धा विकास यात्रा करत आहे. मी सरगुजा येथील जनतेला विचारू इच्छितो की काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये कुणाला 1 रुपये किलो तांदूळ दिले आहेत का? त्यांनी कुठल्या मेडिकल क्लेम सुविधा दिल्या? त्यांनी जे 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकार 4 वर्षांमध्ये करत आहे. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे असे रमण सिंह म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...