आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षाच्या चिमुकलीवर केला बलात्कार, आरोपी CCTV मध्ये झाला कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- शहरात पोलिसांची भीती संपत चालली आहे. तीन दिवसांपूर्वी भावनगर रोजजवळ एका 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले. खुप शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. फोरेंसिक रिपोर्टमधून तिच्यावर बलात्कार करण्यात असल्याचे समोर आले आहे. तसेच, आरोपींनी लोखंडी वस्तूनने वार करून तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे, यात आरोपी चिमुकलीला घेऊन जातानादिसत आहे.

 

पोलिसांचे 8 पथक सज्ज...
राजकोट शहराचे नाव खराब करणाऱ्या या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या 8 टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याच ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीची हत्या झाली होती, त्याचा आद्याप काहीच सुगावा लागलेला नाही. याशिवय थोरणा परिसरात दारू-जुगार यांसह देह-व्यापार देखील करण्यात येतो, अनेकवेळा येथून महिलांना पकडण्यात आले आहे. तरी देखील पोलिस प्रशासन या दिशने कुठलीच ठोस कार्यवाही करत नाहीये.


पुढील स्लाइडवर पाहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे दृष्य...

बातम्या आणखी आहेत...