आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर लिट फेस्टमध्ये येणार नाहीत प्रसून जोशी, करणी सेनेच्या विरोधाची शक्यता पाहून निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसून जोशी म्हणाले, मला यावर्षी साहित्य आणि कवितेवर प्रेम असलेल्यांबरोबर Jlf मध्ये चर्चा करता येणार नसल्याचे दुःख राहील. (फाइल) - Divya Marathi
प्रसून जोशी म्हणाले, मला यावर्षी साहित्य आणि कवितेवर प्रेम असलेल्यांबरोबर Jlf मध्ये चर्चा करता येणार नसल्याचे दुःख राहील. (फाइल)

जयपूर - सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (ससॉर बोर्ड) चे अध्यक्ष प्रसून जोशी यंदा जयपूर लिटरेचर फेस्टीव्हल (JLF) मध्ये सहभागी होणार नाहीत. अनेक दिवसांपासून अंदाज लावले जात होते की, करणी सेनेचा विरोध पागता प्रसून जोशीचे सेशन रद्द केले जाईल. आता प्रसून यांनी स्वतःच पत्र लिहून आपण येणार नसल्याची माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाला सल्ल्याचा आधार घेऊनच सर्टिफिकेट दिले असल्याचेही ते म्हणाले. 


सहभागी होत नसल्याचे दुःख 
- प्रसून म्हणाले, मी यावेळी Jlf मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मला त्याचे दुःख राहील. पण माझ्यामुळे साहित्य रसिक, आयोजक आणि इतर लेखकांना त्रास होऊ नये असे मला वाटते.  
- चित्रपटाबाबत बोलायचे तर नियमांनुसार सल्ले लक्षात घेऊन चित्रपटाला सकारात्मक विचार आणि भावनांसह प्रमाणपत्र देण्यात आले. 
- एकमेकावर विश्वास ठेूवून आपणत तयार केलेल्या प्रक्रियांवरही विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे असे वाद टाळता येतील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...