आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली. रविवारी गुजरात विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षांत समारंभात बोलताना राष्ट्रपती म्हणाले, कलाम अंतराळशास्त्रज्ञ होते. तर मोदी समाजशास्त्रज्ञ आहेत. या विद्यापीठाने डॉ. विक्रम साराभाई, डॉ. कस्तुरीरंगन आणि अमित शहा यांच्यासारख्या यशस्वी व्यक्ती दिल्या आहेत. कलाम यांनी येथे दोन वर्षे संशोधन केलेले आहे. विद्यार्थ्यांनी या माजी विद्यार्थ्यांमधून आपले मार्गदर्शक शोधावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नरेंद्र मोदी यांनी आयुष्यात कठीण परिस्थितीशी झगडून आपला मार्ग निवडला. पंतप्रधानपदापर्यंत ते पोहोचले आहेत. देशातील दोन महान व्यक्तिमत्त्वे अब्दुल कलाम व नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. कलाम यांनी वृत्तपत्रे विकून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते रोज १५ किमी सायकल चालवत महाविद्यालयात येत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर ‘चहावाला पंतप्रधान’ असे म्हटले गेले.
तुमच्यापैकी कोणाला चहा विकण्याची संधी मिळाली असेल, असे मला वाटत नाही. या दोन महान व्यक्ती एकाच देशातील आहेत. एक तर तुमच्याच राज्यातील आहेत. याहून अधिक प्रेरणादायी गोष्ट दुसरी कोणती असू शकते? शास्त्रज्ञ कधी मागे वळून पाहत नाहीत. त्यांची भविष्याकडे नजर असते. या दोन्ही महापुरुषांच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्ती त्यांच्यापासून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत, असे गौरवोद््गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी काढले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.