आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजाऱ्याने टिळा लावून सांगितली हत्येची गोष्ट, रामचरित मानस ऐकवून म्हणाला- मी निर्दोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा)- केरोसिन व्यावसायिक सरदारा सिंह सैनी हत्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. जो पूजारी हत्येच्या दिवशी सर्वात पुढे येऊन पोलिसांना सर्व माहिती देत होता, तोच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. पंडित नेत्रपाल सिंह याने मीडियाला घटनेची कहानी सांगण्याआधी पोलिसांच्या कॅमेऱ्यात पाहून टिला लावला. यानंतर त्याने सांगितले की, मी शुभम सूद याच्यासोबत मिळून ही हत्या घडवून आणली. पुजारी नेत्रपालने डिटेक्टिव स्टाफ ऑफिसमध्ये रामचरित मानसची चौपाई ऐकवून सांगितले की, त्याला या हत्येचा आजिबाद पश्चाताप नाही. दुष्ट लोकांसांठी हेच विधान आहे. 


रामचरित मानस वाचून स्वत:ला सांगतो योग्य...
- नेत्रपालने विनय न मानत जलधजड़, गए तीन दिन बीत. बोले राम सकोच तब भय बिन हो न प्रीत, लक्ष्मन बान सरासर... हा श्लोक ऐकवला.
- त्याने या कढव्याचा अर्थ सांगताना म्हणाला की, जेव्हा तीन तपस्यर्या केल्यानंतर देखील समुद्राने मार्ग दाखवला नाही, तेव्हा भगवान रामाने अग्नि बाण चढवला. यावर समुद्राने माफी मागून मार्ग बनवण्याची युक्ती सांगितली.
- अशा प्रकारे त्याने देखील सरदारा सिंह याला समाजावून सांगितले होते, पंरतु त्याने ऐकले नाही त्यामुळे त्याची हत्या केली. नेत्रपालने सांगितले की, त्याच्यासाठी जरी हा गुन्हा असला तरी अनेक महिला आणि बहिणींसाठी हा न्याय आहे.


धार्मिक प्रवचन देऊन साथिदाराला केले तयार...
- पुजारी नेत्रपालने शुभम सुदसोबत मिळून हत्या केली. शुभमला मी आधी धार्मिक प्रवचन ऐकवले, राक्षसाची हत्या करण्याचे सांगून त्याला या कामासाठी तयार केले. त्याचे ब्रेनवॉश करताना सांगितले की, एका राक्षसाची हत्या कराची आहे.
- तो महिला आणि मुलींवर वाईट नजर ठेवत होता. हे काम करून दोघाना पुण्य मिळेल. माझ्या बोलण्यात येऊन शुभम तयार झाला. कारण त्याची माझ्या वडिलांवर खुप श्रद्धा होती, हे मला आधीच माहिती होते.
- हत्येनंतर सरदारा सिंहवर अंत्यसंस्कार करण्याआधी मी त्याच्या तोंड्यात मंत्रोच्चार करून तुलसी पत्र ठेवले. शास्त्रात लिहिले आहे की, मृत्यूनंतर तोंडात तुलसीपत्र ठेवल्यास कुठलेही पाप राहत नाही. तुलसी पत्र ठेऊन मी माफी मागितली, म्हणजे मी पापमुक्त झालो.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- पुजारी नेत्रपालने सांगितले की, सरदारा सिहं ने शाकुंभरी देवीचे मंदिर बनवले होते, यात तो गोल्या चार वर्षांपासून पूजा अर्चना करत होता.
- सरदारा सिहंने आठ महिण्यांपूर्वी काम करण्यासाठी त्याच्या पत्नीला ऑफिसमध्ये ठेवले होते.
- त्याने आरोप केला आहे की, एक दिवस सरदारा सिंहने त्याच्या पत्नीसोबत चुकीचे काम केले. असे करताने त्याने सरदाराला पाहिले.
- त्याने 15 दिवासानंतर पत्नीला तेथून काढून टाकले होते. नेत्रपालने सांगितले की, आता तो पुन्हा त्याच्या पत्नीला बोलवत होता. न गेल्यास धमकी देत होता. यामुळे नेत्रपाल त्रस्त झाला होता. या मुळे त्याने सरदारा सिंहच्या हत्येचा कट रचला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...