आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एका मुलीचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाळेतील टीनएज मुलगी तिच्या डोळ्यांच्या अदाने सर्वकाही बोलून जाते. आपले प्रेम व्यक्त करताना दिसते. मुलीच्या अदा या अनेकांना घायळ करुन गेल्या आहेत. त्यावरच फिदा होत ट्विटरवर ती ट्रेंड करायला लागली आहे. त्यासोबतच यूजर्स ट्विट्सद्वारे तिच्याकडे आपली 'दिवानगी' ही बोलून दाखवत आहेत. व्हॅलेंटाइन डेआधी आलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय झाला आहे.
टीएनएज लव्ह व्हिडिओ
- फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेली मुलगी ही वास्तविक मल्याळम चित्रपटातील अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियर आहे.
- 18 वर्षांची प्रिया वारियर केरळ मधील त्रिशूर येथील रहिवासी आहे. सध्या ती त्रिशूर येथील विमला कॉलेजमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेत आहे.
- प्रियाची डेब्यू फिल्म 'Oru Adaar Love' चे गाणे 'Manikya Malaraya' ची एक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- हे गाणे शाळेतील टीएनएज मुलांमध्ये शूट झालेले आहे. यूट्यूबवर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. त्यासोबतच ट्विटरवर त्याचे मीम तयार करुन शेअर केले जात आहे.
- आतापर्यंत या गाण्याला यूट्यूबवर 4 लाखवेळा पाहिले गेले आहे.
- उमर लुलु हा 'Oru addar Love' या चित्रपटाचा पटकथा लेखक आणि डायरेक्टर आहे. तर शान रहमानने चित्रपटाला संगित दिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावरील रिअॅक्शन...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.