आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकाने रोहिंग्यांची भेट घेताच झाली Troll; सोशल मीडियावरुन PAKमध्ये जाण्याचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोप्राने बांगलादेशी शरणार्थी रिहिंग्या मुस्लिमांची भेट घेतल्याने सोशल मीडियावर गहजब उडाला आहे. बॉलिवूड-हॉलिवूड अॅक्ट्रेस असण्यासोबतच यूनिसेफची राजदूत असलेल्या प्रियंका चोप्राला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. 

 

- प्रियंकाने सोमवारी बांगलादेशातील कॉक्स बाजार भागात राहाणाऱ्या रोहिंग्यांची भेट घेतली. त्यांच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत प्रियंकाने त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 
- यानंतर सोशल मीडियावरुन प्रियंकाला वेगवेगळे सल्ले देण्यात आले. त्यासोबतच काही प्रश्नही विचारण्यात आले आहे. कोणी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला, तर कोणी कधी काश्मीरी पंडितांचीही कधी भेट घेतली का? असा सवाल केला आहे. 
- एका यूजरने प्रियंकाला विचारले, कधी काश्मीरी पंडितांची भेट घेतली आहेस का? त्यासोबतच कधी स्वतःच्या देशातही डोकावून पाहाण्याचा सल्लाही दिला आहे. कारण गरीबी येथेही आहे. 
- एका यूजरने लिहिले, काश्मीरी पंडितांबद्दलही कधी विचार कर. ते तर आपल्याच देशाचे आहेत. 
- एका यूजरने सल्ला दिला, की कधी पाकिस्तानातही जा, तेथील हिंदूंची दारुन आवस्था आहे. ते कैद्यांसारखे जीवन जगत आहेत. 
- एका ट्रोलरने प्रियंकाला सवाल केला, की किती रोहिंग्या मुलांना दत्तक घेणार आहे? 
- काही सोशल मीडिया यूजर्सने प्रियंकाच्या रोहिंग्या भेटीला पब्लिसीटी स्टंट म्हटले आहे. त्यासोबतच आव्हान दिले आहे, की खरे समाजकार्य तेव्हा होईल जेव्हा ती एखाद्या रोहिंग्यासोबत लग्न करेल. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रोहिंग्या मुला-मुलींसोबतचे प्रियंकाचे फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...