आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुराणाच्या विचारांतून मुस्लिमांत कुटुंब नियोजनाचे प्रबाेधन; तीन दशकांपासून जनजागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘आदमी के बच्चे बंदर के बच्चे ना हो... असे कुराण सांगते. कुटुंब नियोजन हे इस्लामविरोधी अजिबात नाही, उलट जेवढ्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडता येत असेल तेवढीच मुले जन्माला घालण्याचा माणसाला अधिकार आहे, हाच तर्कसंगत विचार कुराणात सांगितलेला आहे. ही भूमिका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि इस्लामविषयी आंतरराष्ट्रीय विचारवंत  मौलाना डॉ. सादिक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केली. गेल्या तीन दशकांपासून मुस्लिम समाजात कुटुंब नियोजनाच्या जनजागृतीसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे.    


इस्लामचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि प्रबोधनकार धर्मगुरू डॉ. सादिक यांनी अरेबिक विषयात त्यांचे संशोधन केले. त्या अभ्यासाच्या आधारे धर्मग्रंथांमधील मूलभूत शिकवणीवर ते प्रवचने करतात. धर्मग्रंथ तर्क सांगतात, मात्र लोक त्यांचे अवडंबर करतात असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील कुटुंब नियोजनाबाबतचे गैरसमज खोडून काढण्याचे काम ते गेल्या तीस वर्षांपासून करीत आहेत. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धार्मिक सभा आणि प्रवचनांच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. 

मौलाना डॉक्टर सादिक म्हणाले की, ‘सध्या आपल्या देशासमोर गरिबी, भ्रष्टाचार आणि अज्ञान हे तीन मुख्य शत्रू आहेत. त्यातील अज्ञान हा शत्रू माणसांचे माणसांप्रमाणे जगणेही मुश्कील करीत आहे. कुटुंब नियोजनाबाबत मुस्लिम समाजात असलेले अज्ञान हे समाजाच्या मागासलेपणाचे आणि स्त्रियांच्या अवनतीचे महत्त्वाचे कारण आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील या अज्ञानावर आपण मात करू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यासाठी त्यांनी तौहिद ट्रस्टची स्थापना केली. 


ताैहित ट्रस्टद्वारे जनजागृतीचे कार्य
मौलाना डॉ. कल्बे सादिक हे तौहिद ट्रस्टच्या माध्यमातून मुस्लिम समाजात शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यासोबतच संपूर्ण देशासह जगभर फिरून कुराणमधील कुटुंब नियोजनाचा मानवी विचार मांडत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...