आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ कॉल सुरू असताना प्रियकरासमोरच प्रेयसीने घेतली रेल्वेखाली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोलो रेल्वे स्टेशनजवल 4 डिसेंबर 2017 ला रेल्वे पटरीवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. - Divya Marathi
तोलो रेल्वे स्टेशनजवल 4 डिसेंबर 2017 ला रेल्वे पटरीवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता.

धनबाद (झारखंड)- तोलो रेल्वे स्टेशनजवल 4 डिसेंबर 2017 ला रेल्वे पटरीवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. तिथेच तिचा मोबाईल देखील पडलेला होता. या तरूणीची ओळख 17 वर्षाची दिव्या कुमारी अशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तरूणीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या दिवशी आपल्या प्रियकरासोबत फोनवर बोलने झाले नाही, या कारणाने तरूणीने रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्या दरम्यान ती प्रियकरासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. त्यामुळे प्रियकराने तिला रेल्वेसमोर उडी मारताना देखील पाहिले होते.


तरूणीच्या नातेवाइकांना देखील अफेयरची माहिती...
- तरूणीच्या आत्महत्येनंतर समोर आले की, दिव्या कुमारी बोकारो येथील रहिवाशी होती, तर तिचा प्रियकर साहिल गुप्ता चास येथील होता. तरूणीच्या नातेवाईकांना या दोघांच्या अफेयरविषयी माहिती होते.
- साहिल एका ट्रेनिंगसाठी दिल्ली येथे गेला होता. 13 डिसेंबर 2017 च्या रात्री 3 वाजेपर्यंत दोघांमध्ये मोबाईल फोनरून बोलणे सुरू होते. तेव्हापासूनच साहिलचा फोन बंद येत होता. दिव्याला संशय आला की, साहिलचे दुसऱ्या तरूणीशी अफेयर सुरू आहे आणि तो दुसऱ्या फोनवरून तिच्याशी बोलत असेल.

 

तरूणाने केला होता वाचवण्याचा प्रयत्न...
- साहिलचा मोबाईल फोन सलग तीन तासांपर्यंत स्विच ऑफ येत होता, त्यामुळे दिव्या चिंताग्रस्त झाली होती. तिला संशय आला की, साहिल फोन बंद करून दुसऱ्या फोनवरून दुसऱ्या तरूणीशी बोलत असावा. एवढ्याशा गोष्टीवरून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि घरातून रेल्वेलाईनवर पोहोचली.
- दिव्या घरातून निघाली तेव्हा साहिलाचा फोन लागला होता, तेव्हा तो तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, तिच्या घरच्यांना देखील तिच्या मोबाईलच्या माध्यामातून तिचे लोकेशन कळवत होता. परंतु, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दिव्याने रेल्वेखाली उडी घेऊन आयुष्य संपवले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...