आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ladies SPL : रेल्वेमध्ये लोअर बर्थ-सीटचा कोटा निश्चित, ई-बुकिंगमध्ये प्रेग्नेंटचा वेगळा कॉलम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमध्ये महिलांसाठी लोअर बर्थ-सीटचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. - Divya Marathi
रेल्वेमध्ये महिलांसाठी लोअर बर्थ-सीटचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

रायपूर - रेल्वेमध्ये महिलांसाठी लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीतील कोचमध्ये वेगवेगळी संख्या निश्चित करण्यात आली आहे. मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व स्लिपर कोचमधील महिलांना सहा-सहा बर्थ राखीव असणार आहेत. त्यासोबतच गरीब रथच्या थर्ड एसी कोचमध्येही महिलांसाठी राखीव बर्थ असणार आहेत. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी सर्व मेल-एस्क्स्प्रेस ट्रेनमधील थर्ड आणि सेकंड एसी कोचमध्ये 3-3 बर्थ राखीव असतील. राजधानी आणि दुरांतोसारख्या पूर्ण एसी ट्रेनमधील थर्ड एसी कोचमध्ये 4 लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

 

नवीन सॉफ्टवेअर तयार करणार
- रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, लोअर बर्थ कन्फर्म करण्यासाठी रेल्वेची आयटी ब्रँच रिझर्व्हेशन सिस्टिमसाठी नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन ते कार्यन्वित होईल. 

 

महिलांना वयाच्या टप्प्याने मिळेल प्राधान्य 
- रेल्वेमध्ये वेटिंग तिकीटावर प्रवास करणाऱ्या महिलांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रेल्वे सध्या असे सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहे, ज्याद्वारे वेटिंग तिकीट असलेल्या महिलांच्या तिकीट कन्फर्म करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. 
- एवढेच नाही तर बर्थ रिकामी असेल तर टीटीई कडून महिलांना बर्थ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येथेही वयाच्या टप्प्यानुसारच प्राधान्य दिले जाणार आहे. 

 

ज्येष्ठ नागरिकांसाठीही कोटा निश्चित 
- ज्येष्ठ नागरिकांसाठीही आता रेल्वेमध्ये बर्थसाठी कोटा निश्चित करण्यात आला आहे. वास्तविक लोअर बर्थचा कोटा वाढल्यामुळे यासाठीचे बुकिंग हे सोपे राहिलेले नाही. यातही दलाल बर्थ मिळवून देण्यासाठी जास्त पैसे मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ निवडण्याचा पर्याय दिला आहे. आयआरसीटीसीने ई-तिकीट बुकिंगवर ही सुविधा दिली आहे. हा पर्याय निवडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ मिळण्याची गॅरेंटी आहे. 

 

ई-तिकीट बुकिंगमध्ये गर्भवती महिलांची वेगळी कॅटेगरी 
- नव्या सिस्टिममध्ये लोअर बर्थची सुविधा गर्भवती महिलांनाही मिळणार आहे. सध्या गर्भवती महिलांना रेल्वे काऊंटरवरुन तिकीट बुक केल्यास लोअर बर्थची सुविधा दिली जाते. आता ई-तिकीटिंगसाटीही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...