आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही होऊ शकता राज्यसभा सदस्य, अशी असते प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या 23 मार्च रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेवर 6 सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. 15 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तोपर्यंत एकही अर्ज मागे घेतला गेला नाही तर ही निवडणूक रंगतदार होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे सामान्यांना फार कुतुहल नसते, कारण यासाठीची किचकट असलेली मतदान प्रक्रिया. या पॅकेजमध्ये आम्ही राज्यसभेची निवडप्रक्रिया कशी असते हे सांगणार आहोत. 

 

काय फरक आहे लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात 
- लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे दोन सभागृह आहेत. लोकसभेमध्ये जनतेने निवडून दिलेले सदस्य असतात. तर राज्यसभेमध्ये राज्यांच्या विधानसभांचे आमदारांकडून सदस्यांची निवड होते. त्यासोबतच राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात.
- राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. मात्र हे वरिष्ठ सभागृह असून याची सदस्य संख्या लोकसभेपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. 
- राज्यसभेचे प्रमुख कार्य हे राज्याच्या हितांचे रक्षण करणे आहे. 
 - भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 80 नुसार राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. यात 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. तर उर्वरित 238 हे लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक राज्यांतून निवडून येतात. 
- कोणत्याही राज्याची व्यक्ती ही कोणत्याही राज्यातून राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. घटनातज्ज्ञांनी स्पष्ट केले होते की ज्या राज्याची निवडणूक आहे त्याच राज्याचा किंवा राज्याची व्यक्ती ही उमेदवार असू शकते. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासाठी आग्रही होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि कोणत्याही राज्याचा व्यक्ती कुठून ही निवडणूक लढवू शकते हा तर्क मान्य केला गेला. 
- मात्र आजही आपण पाहातो की बाहेरच्या राज्याची व्यक्ती सदस्य झाल्यास नेत्यांमध्ये असंतोष राहातो. 

 

अशी होते राज्यसभा सदस्याची निवड 

 

प्रत्येक दोन वर्षांनी निवडले जातात सदस्य
- राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकला राज्यसभेची मंजूरी मिळाल्याशिवाय त्याचा कायदा होत नाही. त्यामुळे राज्यसभेमध्ये बहुमत असणे हे केंद्र सरकारला आवश्यक असते. 
- सध्याच्या राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 आहे. यापैकी 238 सदस्यांची निवड ही निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त करत असतात. त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हटले जाते. 
- देशातील चांगले खेळाडू, विविध विषयातील तज्ज्ञ, लेखक, कलाकार अशा विविध क्षेत्रातील लोकांची राष्ट्रपती निवड करतात. क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांची यूपीए-2 च्याकाळात निवड झाली होती. हे राष्ट्रपती नियुक्त बारा सदस्यांपैकी दोघे होते. त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. 
- राज्यसभेचे प्रत्येक दोन वर्षाला एक तृतियांश सदस्य निवृत्त होत असतात. तेवढ्याच जागांसाठी निवडणूक होत असते. 

 

कोण-कोण मतदान करतात? 
- राज्यांच्या विधानसभेतील सदस्य राज्यसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करु शकतात. मात्र इतर सर्व निवडणुकींपेक्षा ही निवडणूक प्रक्रिया खूप वेगळी असते. 

 

उमेदवारीसाठी पात्रता काय आहे? 
- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 84 मध्ये सदस्याची पात्रता सांगितली आहे. 
- त्यानुसार उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे. 
- त्याचे वय किमान 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. 
- तो दिवाळखोर असू नये. त्यासोबतच तो कोणतेही लाभाचे पद भूषवत असू नये. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या दिल्लीतील निवडणूकत गाजला होता. 
- आपने ज्यांना राज्यसभेसाठी नॉमिनेट केले होते. त्यांच्याकडे लाभाचे पद असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. 

 

अशी समजून घ्या प्रक्रिया 
- ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण उत्तर प्रदेश राज्याचे उदाहरण घेऊ. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. 
येथे विधानसभेचे 403 सदस्य आहेत. येथून राज्यसभेसाठी 11 सदस्यांची निवड होणार आहे. 
- प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळले म्हणजे तो विजयी होतो हे ठरवण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. - हा कोटा निश्चित करण्याची एक प्रक्रिया आहे. ती अशी आहे की, प्रत्येक सदस्याला किती मते पाहिजे हे ठरविण्यासाठी एकूण आमदारांच्या संख्येत 11मध्ये 1 जोडून त्याचा भागाकार केला जातो. 
- म्हणजे 403/12=33. या 33 मध्ये 1 मिळवून आलेले उत्तर हा मतांचा कोटा असतो. 
- 33+1=34 म्हणजे 34 हा मतांचा कोटा निश्चित होतो. याचा अर्थ असा की उत्तरप्रदेशातून कोणाला राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जायचे असेल तर त्याला कमीतकमी 34 मते मिळाली पाहिजे. 

 

आमदार प्राधान्यक्रमाने देतात मत 
- जर राज्यसभेच्या जागा 11 आहेत आणि उमेदवार 12 आहेत तेव्हा मतदान होते. हे मतदान आमदार करतात. ते प्रत्येक 12 उमेदवारांना प्राधान्यक्रमाने मतदान करतात. मग पहिली पसंती कोणाला, दुसरी कोणाला असे 12 उमेदवारांना ते पसंतीक्रमाने मतदान करतात. यामध्ये आधी ठरल्याप्रमाणे पहिल्या पसंतीची 34 मते ज्याला मिळाली ते विजयी घोषित होतात.  
- पहिल्या पसंतीक्रमासाठीच घोडेबाजार चालत असतो. याला इंग्रजीत हॉर्स ट्रेडिंग हा प्रचलित शब्द आहे. 

 

आता आपण महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ... 
- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 राज्यसभा सदस्य निवडून द्यायचे आहेत. आणि 7 उमेदवार रिंगणात आहे. 
15 तारखेला भाजपच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर उर्वरीत 6 उमेदवारांची बिनविरोध निवड होईल. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, विजया रहाटकर या अर्ज मागे घेतील.  
- म्हणजे, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही.मुरलीधरन हे तीन भाजपचे उमेदवार, याशिवाय शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे कुमार केतकर हे सहज विजयी होऊ शकतात. अन्यथा घोडेबाजार अटळ आहे. 
- महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 42 मतांची गरज आहे. 
- काल-परवापर्यंत काँग्रेसकडे 42 मते होती. ज्येष्ट नेते पतंगराव कदम याचे निधन झाले. नितेश राणे हे काँग्रेसचे आमदार असले तरी ते आणि कालीदास कोळंबकर हे राणे समर्थक आहेत. यामुळे काँग्रेस उमेदवार कुमार केतकर यांना 42 मतांसाठी 3 मतांची बेगमी करावी लागेल. 
- यात त्यांना शिवसेनेची मदत होऊ शकते. सेनेकडे 63 आमदार आहेत. त्यांचे उमदेवार अनिल देसाई यांना पहिल्या पसंतीची 42 मते मिळाल्यानंतर 11 मते  शिल्लक राहातात. ही मतं कोणाच्या पारड्यात पडतात हे पाहावे लागेल. 

 

पुढील स्लाइडमध्ये समजून घ्या मतांच्या कोट्याचे गणित... 

बातम्या आणखी आहेत...