आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत नाटकास गेलेल्या 5 मुलींवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ तयार करून धमकावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडमधील खुंटीमध्ये पाच मुलींवर गावातील गुंडांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. या मुली मंगळवारी मानव तस्करीच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी व शिक्षणात मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी पथनाट्य सादर करण्यास गेल्या होत्या. यातील दोन मुली अल्पवयीन आहेत.

 

राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीनसदस्यीय समिती स्थापन केली आहे. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे या घटनेचा अहवाल मागवला आहे.  पोलिसांनी सांगितले, या गुन्ह्यातील आरोपी पत्थलगडीत सहभागी आहेत. यापैकी तीन आरोपींची ओळख पटली आहे.  


सरकारशी असहकार्य करण्याची पत्थलगडींची भूमिका  : पत्थलगडी अादिवासी समाजाची परंपरा आहे. याद्वारे गावाची सीमा बंद केली जाते. मात्र, याआडून अवैधरीत्या पत्थलगडी केली जाते. एका दगडावर ग्रामसभेचा अधिकार देणाऱ्या भारतीय घटनेतील कलमांची चुकीची व्याख्या केली जाते. त्यावरून गावकऱ्यांना आंदोलनासाठी सिद्ध केले जाते. पत्थलगडी करणाऱ्यांची ग्रामसभामध्ये दहशत वाढली आहे.

 

व्हिडिओ तयार करून धमकावले  
मंगळवारी शाळेत पथनाट्य सादर करत असताना दोन दुचाकींवरून सहा गुंड तेथे आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत या मुलींना उचलले आणि अज्ञात स्थळी नेले. तेथे पाच मुलींवर या गुंडांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या  मुलींना पुन्हा त्याच शाळेत आणून सोडले. तसेच या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्या तरुणींना वाच्यता न करण्याची दमदाटी केली.  तुम्ही सरकारला मदत करता म्हणून तुम्हाला ही शिक्षा देण्यात येत आहे, असे या गुंडांनी त्यांना सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...