आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशात कैदेतील मुलींची सुटका, संचालकास अटक; लखनऊमधील जमीन हडपण्यासाठीचा कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- लखनऊ येथील एक मदरशात छापा टाकून शुक्रवारी रात्री ५१ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत लखनऊ पोलिसांनी मदरशाच्या संचालकास अटक केली.  कैदेत ठेवून त्यांच्याशी अश्लील चाळे केले जात होते, असा आरोप मुलींनी केला आहे. या मुलींकडून संचालक पाय दाबून घेत होता. तसे न केल्यास जनावरासारखी वागणूक दिली जात होती, असे मुलींनी सांगितले. शनिवारी न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

 
दरम्यान, मदरशाचे संचालक मोहंमद तय्यब झियाची पत्नी शाहीन बानो हिने पतीला मालमत्तेच्या वादातून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला. काही लोक मदरशाची जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. लखनऊचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दीपककुमार यांनी सांगितले, शुक्रवारी सायंकाळी काही वृद्ध मंडळी कार्यालयात भेटण्यास आली होती. सआदतगंज भागात असलेल्या जामिया खदीजतुल कुबरा लीलबनात या मदरशात काही गैरकृत्ये होत आहेत, अशी माहिती दिली.   


अशी कृत्ये गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिस पथकाने मदरशावर छापा मारला. तेथे ५१ मुली सापडल्या. या मुलींनी मदरशाचा संचालक मोहंमद तय्यब झिया हा विकृत मनोवृत्तीचा आहे. तेथे शिकणाऱ्या मुलींची छेड काढतो. सध्या या मुलींना नारी निकेतन येथे ठेवण्यात आले आहे. मदरशात एकूण १२५ मुली शिकतात.   या मुली छाप्याच्या वेळी हजर नव्हत्या. या मदरशास सरकारची परवानगी होती काय? त्याची नाेंदणी होती काय? याची चौकशी करत आहेत

 

बंदिवासातील मुलींनी चिठ्ठी फेकली अन् भांडे फुटले   

सय्यद मोहंमद जिलानी अश्रफ यांनी सांगितले, याआधीसुद्धा आपण मदरशाविरोधात सआदतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण तिकडे दुर्लक्ष करण्यात आले. मदरशातील बंदी बनवलेल्या मुलींनी त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणी एका कागदावर लिहून तो बाहेर फेकला. तेव्हा तो कागद एसएसपी दीपककुमार यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी हा मदरसा बांधून मोहंमद तय्यब याला चालवण्यास दिला. परंतु या मदरशाचे रूपांतर वसतिगृहात करण्यात आले. आम्हाला त्याच्या कृत्यांची माहिती मिळाली आणि पोलिसांत तक्रार दिली.   

 

 

मुलींकडून पाय दाबून घेत असे, संचालकाकडून मारहाण

मुलींनी मदरशात होत असलेले अत्याचार कथन करण्यासाठी अनेक पत्रे लिहिली. आरोपी संचालक विद्यार्थिनींना मारहाण करत होता. पाय दाबून घेत होता. या कामास नकार दिला तर बेदम झोडपून काढत होता. अनेकदा मुलींशी छेडछाड व अश्लील चाळे करत होता.

बातम्या आणखी आहेत...