आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानिपतच्या युद्धात प्राणांची बाजी लावणाऱ्या मराठा वीरांचे स्मरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत (हरियाणा) - पानिपतच्या तिसऱ्या युद्धात ज्या मार्गाने मराठा फौज आली होती त्या मार्गावर म्हणजे कुरुक्षेत्र ते पानिपत अशी दुचाकीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रविवारी काढलेल्या या मिरवणुकीत हरियाणातील शेकडो मराठा तरुण सहभागी झाले होते. मराठा वीरांचे स्मरण करणाऱ्या या कार्यक्रमास नागपूरच्या भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले व जिजाऊंच्या घराण्याचे वंशज बाबाराजे जाधव, इतिहासकार वसंतराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

काय आहे इतिहास

अहमदशाह अब्दालीच्या विरोधात मराठा साम्राज्याचे तिसरे पानिपत युद्ध झाले होते. या लढाईत मराठा वीरांनी प्राणांची बाजी लावली होती. १७६१ मध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धास २०११ मध्ये २५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा हरियाणातील मराठी अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकारामुळे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हे लढ्याचे २५७ वे वर्ष आहे. मराठा जागृती मंचातर्फे रविवारी काला आम युद्धभूमीवर मराठी शौर्य दिन साजरा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...