आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Renuka Chaudhary BJP Minister And Other Leaders Comment On Unnao Kathua Cases News And Updates

भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या 1-2 घटना घडतातच; केंद्रीय मंत्री गंगवार बरळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - रेप पीडितेवर काँग्रेस लीडर रेणुका चौधरी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बलात्कार पीडितेला पोलिसांकडून शोले चित्रपटातील गब्बरप्रमाणे विचारले जाते की कितने आदमी थे. देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. तर दुसरीकडे मोदींचे मंत्री संतोष गंगवार यांनी "भारतसारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडत असतात. ही काही मोठी गोष्ट नाही."


महिला आज बाहेर पडत नाहीत
- रेणुका एका कार्यक्रमात म्हणाल्या, "एकेकाळी चित्रपट शोलेमध्ये गब्बरचा डायलॉग होता - 'कितने आदमी थे' पण, आज एखादी मुलगी घराबाहेर पडत असेल आणि तिच्यावर बलात्कार होत असेल तर पोलिस सुद्धा तिला हाच प्रश्न विचारतात बेटी कितने आदमी थे."
- रेणुका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा निशाणा साधला. "देशात अशी परिस्थिती असतानाही पंतप्रधानांना परदेशात फिरण्याचे शौक पूर्ण करत आहेत. त्यांनी कधी पीडितेच्या कुटुंबियांनी त्यांचे हाल विचारले नाहीत." 


मोदींचे मंत्री बरळले, अशा एक-दोन घटना घडतातच
- तर दुसरीकडे, मोदी कॅबिनेटचे मंत्री मंत्री संतोष गंगवार यांनी देखील बलात्काराच्या घटनांवर संतापजनक विधान केले आहे. उन्नाव आणि कठुआ रेप प्रकरणांवर बोलताना ते म्हणाले, "भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक दोन घटना घडतातच. ही काही मोठी गोष्ट नाही. अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाऊ शकत नाहीत. तरीही सरकार तत्परतेने काम करत आहे."


सद्यस्थितीला जास्तीची प्रसिद्धी मिळत आहे -हेमा मालिनी
मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी शनिवारी अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंबंधी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, 'मुली आणि महिलांवर आधीही बलात्कार होत होते, मात्र सध्या अशा घटनांना जास्त पब्लिसिटी मिळत आहे.' कठुआ-उन्नाव-सूरत येथे मुलींसोबत झालेल्या दुष्कर्मामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन अशा घटनांचा विरोध करत आहेत. दोषींना फाशीची मागणी जोर धरत आहे. शनिवारीच मध्यप्रदेशातील एक प्रकरण समोर आले. या घटनेत अवघ्या 4 महिन्यांच्या बालिकेसोबत तिच्याच नात्यातील व्यक्तीने दुष्कृत्य करुन मुलीची हत्या केली.

बातम्या आणखी आहेत...