आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार सरकारचा समाचार घेतला आहे. सरकारवर तोंडसुख घेत असताना तेजस्वी यांच्याकडून सोशल मीडियावर बलात्कार पीडितेची ओळख करुन दिल्याने ते फसले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेजस्वी यांच्या कृतीवर अक्षेप घेतला आहे. आयोगाच्या सदस्य सुषमा साहू म्हणाल्या, 'बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी महिला आयोग तेजस्वी यादव यांना नोटीस बजावणार आहे.' दुसरीकडे, जेडीयूनेही तेजस्वी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, 'खरोखर तेजस्वी यांनी सिद्ध केले की ते नववी पास आहेत.'
काय म्हणाले होते तेजस्वी यादव
- बिहारमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरुन नितीश सरकारला घेरण्यासाठी तेजस्वी यादव यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी गया येथे एका मुलीसोबत झालेल्या दुष्कृत्याचा उल्लेख करताना तिच्या फोटोसह तिचे नावही जाहीर केले होते.
- ट्विटमध्ये म्हटले होते, '8 वर्षांच्या चिमुकलीचे नितीश सरकार प्रायोजित गुंडानी अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. एवढ्यावरच हे लोक थांबेल नाही तर त्यांनी त्या लहानगीची हत्या केली. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीही संवेदना उरलेली नाही, ते गयामध्ये असताना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यास गेले नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.