आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनास संघाचा पाठिंबा : मोहन भागवत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर- बिहारमधील मुझफ्फरपूर भागात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, गाव व देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मालास कोणत्याही परिस्थितीत हमीभाव मिळायलाच हवा. त्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 

समाजातील सर्वसामान्य माणूस सर्वगुणसंपन्न होऊन जोपर्यंत आपले राष्ट्रीय आचार-विचार चांगले ठेवणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणे शक्य नाही. देशाच्या प्रगतीसाठी कंत्राटी पद्धतीने काम करण्याची सवय सोडून द्यावी लागणार आहे. कारण समाज अथवा राष्ट्राचा विकास कोण्या एका व्यक्तीचा किंवा समूहाचा नव्हे तर आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे भागवत म्हणाले. 

 
मोहन भागवत बिहारमध्ये सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पाचव्या दिवशी सरसंघचालकांनी गावातील शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...