आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीच्या जिल्हा रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा संचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरदोई - उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेकडे आरोग्य विभागाची डोळेझाक सुरू आहे. यासंदर्भात माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी जनरल वॉर्डात भटके कु़त्रे फिरत असल्याच्या तक्रारी केल्या. माध्यमांनी या तक्रारीची शहानिशा केली तेव्हा जनरल वॉर्डात भटके कुत्रे फिरत असल्याचे प्रतिनिधींना दिसले.

 

माध्यमातून या समस्येवर   आवाज उठवण्यात आला. तेव्हा वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. रुग्णालयातील रुग्णांनी सांगितले, येथे नेहमी भटके कुत्रे रुग्णालयाच्या वॉर्डात येऊन बसलेली असतात. यामुळे भरती झालेल्या रुग्णांत आणि नातेवाइकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात वरिष्ठ डॉक्टरांकडे अनेकदा तक्रारी केल्या.


कर्मचाऱ्यांची नियुक्ती  

हरदोईचे मुख्य चिकित्सा अधिकारी (सीएमओ) यांनी म्हटले, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून रुग्णालयात वॉर्डात लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...