आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी घेऊन करत होता ब्लॅकमेल, गँगरेपनंतर केली तरूणीची अशी अवस्था...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- गँगरेपनंतर आगीत झळालेल्या तरूणीच्या परिस्थितीत अजूनही काहीच सुधारणा झाली नाही. सदर घटना ही बीना जिल्ह्यातील देवल गावात घडली होती. आरोपींनी गुरूवारी रात्री आत्याचारानंतर आरडाओरड करणाऱ्या तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे तरूणी 90% भाजली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ललितपुर येथून अटक केली आहे. आधिपासून पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राघवेंद्र सेनवर तरूणींना फोटोद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आऱोप आहे. सध्या तरूणीवर उपचार सुरू आहेत.


चोरून सेल्फी घेऊन तरूणींना करत होता ब्लॅकमेल...
- पीडितेच्या काकाने सांगितले की, 7 दिवसांपूर्वी आरोपीने गावातील एका तरूणीसोबत धोक्याने सेल्फी घेतला होता, तिचा अशातच साखरपूडा झाला आहे. त्याने हा फोटो आपल्या काही मित्रापर्यंत व्हायरल केला होता. आरोपी राघवेंद्र सेल्फीच्या माध्यामातून, त्या तरूणीसोबत मनमानी करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता.
- याविषयी तरूणीच्या नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर दबाव टाकून फोटो डिलिट करण्यास सांगितले. काही दिवसातच तरूणीचे लग्न होणार होते, त्यामुळे नातेवाईकांनी बदनामीच्या भीतीने ही गोष्ट पोलिसांना सांगितली नाही.


एक तास तडपत होती तरूणी....
- पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, घटना गुरूवारी रात्री साडे 8च्या सुमारास घडली. शेजाऱ्यांनी आग विझवल्यानंतर लगेच 108 वर फोन करून इमरजन्सी अँम्बुलंन्स बोलवली. परंतु, गाडी येण्यास थोडा वेळ लागेल असेल तिकडून उत्तर आले. या दरम्यान आम्ही लोक एक तासभर गाडीची व्यवस्था करण्यासाठी गावात गुंतलो होतो.
- यानंतर आम्ही 100 नंबरवर कॉल केला. जवळपास 20 मिनिटांनी ही गाडी आली. या गाडीतून आम्ही पीडितेला रुग्नालायात पोहोचवले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...