आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज पडल्यास बसपसाठी काही जागांवर पाणी सोडू, अखिलेश यादव यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - भाजपला पराभूत करण्यासाठी आमचा पक्ष एक पाऊल पुढे टाकण्यास तयार आहे. त्यामुळे बसपसाठी काही जागांवर पाणी सोडण्याचीही आमची तयारी आहे, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मैनपुरी येथे एका कार्यक्रमात रविवारी सायंकाळी केले. सपा आणि बसप यांच्यातील युती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

निवडणूकपूर्व आघाडीत सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आपला पक्ष विरोधी आघाडीत राहील, असे बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे युती टिकणार का, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मायावती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिलेश म्हणाले की, सपा-बसप युतीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे भाजप आता आमच्या युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करेल.


या वर्षी यूपीत झालेल्या चार पोटनिवडणुकांत सपा-बसप यांच्या युतीने भाजपचा पराभव केला आहे. भाजपला गोरखपूर, फुलपूर आणि कैराना या लोकसभेच्या ३, तर नूरपूर विधानसभा जागा भाजपला गमवावी लागली. आता आमची युती लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील, युतीसाठी काही जागांवर पाणी सोडण्याची आमची तयारी आहे, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केल्याने त्याला महत्त्व आले आहे.

बातम्या आणखी आहेत...