आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडकमकर, खांडगंेना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगना संध्या पुरेचा आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष २०१७ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  


अकादमीच्या इंफाळ (मणिपूर) येथे झालेल्या बैठकीत वर्ष २०१७ च्या नाट्य अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कलाकारांची, तर उस्ताद बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांची  निवड करण्यात आल्याचे संगीत नाटक अकादमीच्या वतीने जाहीर करण्यात अाले. २०१७ च्या नाट्य अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला या श्रेणींमध्ये  देशातील एकूण ४२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यात नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर व नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग यांची निवड झाली आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी तबलावादक योगेश सामसी यांची, तर लोककलेतील योगदानासाठी  लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली. 

  
डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप
नृत्य क्षेत्रातील  योगदानाबद्दल  डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर  शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना उस्ताद बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...