आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dancer सपना चौधरीला BJP खासदार म्हणाला \'ठुमकेवाली\', मिळाले सडेतोड प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - 'ठुमकेवाली' म्हटल्याच्या वक्तव्यावरून हरियाणवी डान्सर सपना चौधरीने भाजप खासदार अश्विनी चोपडा यांना सडेतोड उत्तर दिले आङे. या वक्तव्याने त्यांची मानसिकता समजते असे सपनाने म्हटले आहे. ते मोठे असल्याने त्यांना माफी मागायला सांगणार नाही, असेही सपना म्हणाली. मी एंटरटेनर आहे आणि मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करते असे सपनाने म्हटले आहे. 


डान्सर सपनाने नुकतीच सोनिया गांधींची भेट घेऊन काँग्रेसचा प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी करनालचे भाजप खासदार अश्विनी चोपडा यांनी तिच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 


काय म्हणाले होते खासदार महोदय?
- 22 जूनला सपना चौधरी यांनी काँग्रेस मुख्यालयात जाऊन म्हटले होते की, त्या सोनिया आणि राहुल गांधींच्या कामाने प्रभावित आहेत आणि त्यामुळे त्यांना काँग्रेसचा प्रचार करण्याची इच्छा आहे. त्यानंतर भाजप खासदार चोपडा यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सपना ठुमकेवाली म्हटले होते. काँग्रेसमध्ये आता ठुमके लावणारे ठुमके लावतील. पण त्यांना निवडणूक जिंकायची की ठुमके लावायचे हे त्यांनाच पाहावे लागेल असेही त्यांनी म्हटले होते. 


प्रियंका गांधींची फॅन आहे सपना
- सपना चौधरीचे म्हणणे आहे की, सध्या तिचा राजकारणात जाण्याचा काहीही विचार नाही. पण ती काँग्रेससाठी प्रचार नक्कीच करू शकते. 
- ती म्हणाली की की प्रियंका गांधींची मोठी फॅन आहे. तसेच सोनियांनीही देशासाठी खूप काही केले आहे, त्यामुळे त्यांच्या कामाने प्रभावित झाल्याचेही सपनाचे म्हणणे आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...