आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरवपाठोपाठ कानपूरमध्येही गैरव्यवहार; रोटोमॅक पेनचा मालक विक्रम कोठारीचा 7 बँकांना चुना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/कानपूर/मुंबई- नीरव मोदीचे प्रकरण सुरू असतानाच तब्बल ७ बँकांचे ३,६९५ कोटी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या रोटोमॅक पेन कंपनीचा प्रवर्तक विक्रम कोठारी हाही सीबीआय आणि ईडीच्या तावडीत सापडला आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा सीबीआयने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी पहाटे ४ वाजता कानपुरात त्याच्या घर व कार्यालयांवर छापे मारण्यात आले. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही त्याच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही तपास संस्थांनी विक्रम कोठारी, पत्नी साधना आणि मुलगा राहुल यांना आरोपी केले आहे. 


आधी कोठारीचा घोटाळा सुमारे ८०० कोटींचा समजला जात होता. मात्र तो २००८ पासून ७ बँकांना फसवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक व ओरिएंटल बँक आॅफ काॅमर्सकडून २,९१९ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. व्याजासह एकूण कर्ज ३,६९५ कोटी रुपयांवर जाते. संध्याकाळी उशिरा त्याच्या अटकेचे वृत्त आले. मात्र, सीबआय प्रवक्त्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. 


मनी लाँडरिंगचा संशय : निर्यातीविनाच विदेशी कंपन्यांकडून रक्कम हस्तांतरण
बँकांकडून कर्जे घेण्यासाठी कोठारीने विजय मल्ल्याप्रमाणेच मनी लाँडरिंग केल्याचा ईडीला संशय आहे. दुसरीकडे, सीबीआयनुसार, कोठारीला ज्या कामासाठी कर्ज दिले होते, त्याच्याऐवजी दुसरीकडेच पैसे वापरण्यात आले. 


एक विशेष एक्स्पोर्ट ऑर्डरसाठी मंजूर कर्ज दुसऱ्या एका विदेशी कंपनीकडे वळवण्यात आले. नंतर निर्यातीची ऑर्डर पूर्ण केल्याविनाच ही रक्कम कानपुरच्या कंपनीत हस्तांतरित केली जात होती. कंपनी विदेशी चलन व स्थानिक चलनातील व्याज दरांच्या फरकांचा फायदा उचलत होती. बँकांनाही अनेक बनावट कागदपत्रे देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...