आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाकूवरून इन्स्पायर होऊन ठेवले दलेर मेहंदी हे नाव, 11 वर्षे वयातच सोडले होते घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार) - सिंगर दलेर मेहंदीला शुक्रवारी 15 वर्षे जुन्या मानव तस्करी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, त्यांना लगेच जामीनही मिळाला. आपल्या आवाजामुळे गायनक्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवणाऱ्या दलेर मेहंदीचे नाव एका डाकूवरून इन्स्पायर होऊन ठेवण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दलेरने 11 वर्षे वयातच गायनासाठी घर सोडले होते. घर सोडल्याच्या 2 वर्षांनंतर म्हणजेच 13 वर्षे वयात त्यांनी पहिली लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स दिले होते.


यांनी ठेवले होते डाकूवरून नाव
- दलेर मेहंदीच्या पॅरेंट्सनी त्याचे नाव डाकू दलेर सिंहच्या नावावरून ठेवले होते. यामुळे त्याचे नाव दलेर सिंह झाले होते.
- काही काळानंतर त्यांनी त्या काळचा प्रसिद्ध गायक परवेज मेहंदीच्या नावावरून मुलाच्या नावासोबत मेहंदीही जोडले. आणि त्याचे नाव झाले दलेर मेहंदी.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दलेर मेहंदी लहानपणी 1 रुपया घेऊन गाणे ऐकवत असे.
- आज दलेर मेहंदी एक सक्सेसफुल म्युझिक कंपोझर आणि सिंगर आहे.

 

एक्ट्रेस आणि मॉडेल आहे सून जेसिका
- पंजाबी सिंगर दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीपने जेसिका सिंहशी युरोपियन कंट्री फिनलंडमध्ये लग्न केले. यात दलेर यांचे फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
- फिनलंडमध्ये जन्मलेली मेहंदीची सून जेसिका ही टॉप मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. बॉलीवूड मूव्हीजमध्येही तिने काम केलेले आहे. ती आपला पती गुरदीपसोबत दिसली होती.
- लग्नाआधी जेसिकाने गुरदीपच्या अपोजिट 'दिल्ली 1984' चित्रपटात लीड रोलही केलेला आहे. रिपोर्ट्सनुसार, गुरदीप आणि जेसिकाचे हे लव्ह मॅरेज आहे.

 

गुरदीपने बॉलीवूडमध्ये केलेला आहे डेब्यू
- आपले वडील दलेर मेहंदी यांच्याप्रमाणेच गुरदीप सिंगर आणि अॅक्टर आहे.
- 2014 मध्ये रिलीज झालेले त्याचे गाणे 'सहेली' खूप हिट झाले होते. यानंतरच त्याने भारतासहित विदेशात अनेक शोजमध्ये परफॉर्म केले. 
- त्याने 2013 मध्ये सईद नूर यांचा चित्रपट 'मेरी शादी कराओ'मधून बॉलीवुड डेब्यू केला होता.
- या चित्रपटात तो सरदाराच्या लीड रोलमध्ये होता. तर राधिका वैद्य लीड अॅक्ट्रेस होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दलेर मेहंदी व त्यांच्या कुटुंबीयांचे फोटोज...