आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; नियंत्रण रेषेवर हल्ल्यात कॅप्टनसह चार जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- पाकिस्तानी जवानांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर केलेल्या तोफगोळ्यांच्या हल्ल्यात एका भारतीय कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. यात दोन युवक जखमी झाले आहेत.


पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमध्ये हल्ला केला. तुफान गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात कॅप्टन कपिल कुंडू, रायफलमन राम अवतार, शुभम सिंह व हवालदार रोशन लाल शहीद झाले. इतर २ जवान जखमी झाले. दरम्यान, दोन्ही बाजूंनी रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता. तत्पूर्वी रविवारी सकाळी पूंछ भागात पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांचा मारा केला. यात एका जवानासह दोन नागरिक जखमी झाले. 


८४ शाळा बंद
पाकच्या गोळीबारामुळे प्रशासनाने नियंत्रण रेषेलगत ५ किमी क्षेत्रात असलेल्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सुंदरबनी ते मंजाकोटपर्यंत ८४ शाळा बंद राहतील. जानेवारीमध्येही या भागतील ३०० शाळा बंद कराव्या लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...