आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHIMLA 8 दिवसांपासून ‘पाणीबाणी’; पर्यटकांना हॉटेल्स रिकामे करण्यासाठी रिफंड ऑफर दिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला -  पर्यटननगरी  आणि थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या सिमल्याच्या इतिहासात प्रथमच पाण्याचे भीषण असे संकट उभे ठाकले आहे. येथे गेल्या ८-९ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. घरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यात उन्हाळ्याच्या मोसमात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक सिमल्याला येत असतात. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे येथील यंत्रणा कोलमडली आहे.

 

हॉटेल व्यवस्थापनाने असमर्थता व्यक्त करत लोकांची नोंदणी रद्द केली आहे. सोमवारी रात्री हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न केला. हिमाचल उच्च न्यायालयाने मंगळवारी शहरातील व्हीव्हीआयपी भागातील टँकर्सचे पाणी रोखण्याचे अादेश दिले. 

 

पर्यटकांना हॉटेल्स रिकामे करण्यासाठी रिफंड ऑफर दिली  

उन्हाळी सुट्यांत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कोंडी झाली आहे. हॉटेल्समध्ये पाणी मिळत नाही. त्यांना रूम रिकाम्या करण्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रिफंड ऑफर दिली जात आहे. साेशल मीडियावरून प्रवाशांनी येथे येण्याआधी फेरविचार करावा, अशा सूचना केल्या जात आहेत. 

 

कोर्ट म्हणाले-  एक आठवड्यात पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम द्या

पाणीटंचाईची िहमाचल उच्च न्यायालयाने दखल घेत मंगळवारी सरकारकडून उत्तर मागवले आहे. महापालिकेने कमीत कमी एक आठवड्यासाठी सिमल्यातील सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी आणावी तसेच शहरात पिण्याच्या पाण्यासाठी एक आठवड्यात एटीएम बसवावेत, असे आदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश संजय करोल तसेच न्यायमूर्ती अजय मोहन गोयल यांच्या पीठाने सिमला महापालिकेस दिले आहेत. न्यायालयाने म्हटले, पिण्याच्या पाण्याच्या झळा साेसणाऱ्या नागरिकांना पाणी मिळवून देण्यासाठी मंत्री, न्यायाधीश व अधिकाऱ्यांसह सर्व व्हीआयपी लोकांना पाण्याचे टँकर्स देण्यात येऊ नयेत. आगीसारख्या दुुर्घटना रोखण्यासाठी पाण्याचा पुरेसा साठा ठेवावा. 

बातम्या आणखी आहेत...