आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरोमणी अकाली दल नेहमीच भाजपचा मित्र राहणार : सुखबीरसिंग बादल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड -  शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांंनी भाजपशी युती अखंड असल्याची ग्वाही दिली. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अकाली दलाच्या नेत्यांनी युतीची हमी दिली. या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादलही उपस्थित होते. २०१९ च्या संसदीय निवडणुकीसाठीची रणनीती अकाली नेत्यांनी या वेळी निश्चित केली. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अकाली दल घटक पक्ष असेल.

 

फेब्रुवारी २०१७ पूर्वी या दोन्ही पक्षांनी युती केली होती. या बैठकीनंतर अमित शहा यांनी ट्विट केले, ‘ बादल यांना भेटणे नेहमीच सुखावह राहिले आहे. प्रकाशसिंग बादल आणि सुखबीर यांची भेट चंदिगड येथील त्यांच्या निवासस्थानी घेतली.’ संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत अमित शहा चंदिगडला आले होते.  

बातम्या आणखी आहेत...