आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरमय्या देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार : अमित शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंटवाल- कर्नाटकमधील सिद्धरमय्या सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असून राज्यातील सत्ताधारी तुष्टीकरण करतात. अशा सरकारला सत्तेवरून उलथवून लावा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.  


सांप्रदायिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या किनारपट्टीवरील प्रदेशात मंगळवारी शहा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. सर्वात भ्रष्ट सरकारचा पुरस्कार ठेवण्यात आला तर हा पुरस्कार सिद्धरमय्या सरकारला जरुर मिळेल. कारण सरकार निर्लज्जपणे भ्रष्टाचार करू लागले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरूच आहे. तुष्टीकरण केले जात आहे. राज्यात भाजप व संघाचे वीस कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. परंतु सिद्धरमय्या सरकार मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांची उलट गणती आता सुरू झाली आहे. भाजप गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना शासन करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.  


भाजपचा सर्वत्र विजय, काँग्रेसने गमावले : मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपने बहुतांश निवडणुकीत विजय मिळवला आहे. परंतु काँग्रेसला मात्र पंजाब वगळता सर्वत्र पराभव स्वीकारावा लागला आहे, असे शहा यांनी सांगितले. आसाम, मणिपूर, उत्तर प्रदेशात मोदी यांची लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचे बूथ स्तरावरील प्रयत्न यातून विजय सुकर होत गेले, असे शहा यांनी सांगितले.  त्रिपुरात अलीकडेच मतदान झाले. या राज्यात भाजपचा निश्चितपणे विजय होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपला निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संघटनेच्या बळावर भाजपने हे विजय मिळवले आहेत, असे शहा यांनी  सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...