आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवज्योतसिंग सिद्धू स्वत:च्या कुटुंबातच वाटत आहेत नोकऱ्या; मा. मंत्री अनिल जोशी यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर -  पंजाबमध्ये बेरोजगार एका-एका नोकरीसाठी झुंजत आहेत, तर राज्याचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्री झाल्यानंतर आपली पत्नी आणि मुलालाही उच्च पदांवर नियुक्त करून आपल्याच कुटुंबात नोकऱ्या वाटण्याचे काम केले आहे, अशी टीका राज्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल जोशी यांनी शुक्रवारी केली.  


जोशी यांनी       एक पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, सिद्धू यांनी मंत्री झाल्यावर पंजाब भांडार मंडळाच्या अध्यक्षपदी स्वत:च्या पत्नीची नियुक्ती केली. आता त्यांनी आपला मुलगा करणवीर सिद्धूची सहायक महाधिवक्ता (एएजी) या पदावर नियुक्ती करून आपल्याच कुटुंबात नोकऱ्या देण्याचा प्रकार सुरू केला आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक घरात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

 

काँग्रेससाठी कठोर परिश्रम करणारे पात्र नेते आणि कार्यकर्ते एखादी जबाबदारी किंवा पद मिळण्याच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत, पण दुसऱ्यांना संधी देणे तर दूरच राहिले, एकाच घरात नोकऱ्या दिल्या जात आहेत. असे करून सिद्धू यांनी जनतेला धोका दिला आहे. राज्याचा विकास दूरच राहिला, ते आपलाच विकास करण्यात दंग आ

 

बातम्या आणखी आहेत...