आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; मृतदेहाचा हात पकडून प्रेयसीचा अाकांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनिना/महेंद्रगड- हरियाणातील इसरानामध्ये अाॅनर किलिंगच्या दाेन घटना घडल्या. त्यापैकी एका घटनेत बुधवारी तरुणीच्या भावाने त्याच्या मित्रांसह प्रदीप नावाच्या तरुणाची लाथा-बुक्क्यांसह दांडक्याने जबर मारहाण करून हत्या केली. घटनेनंतर संबंधित तरुणीने प्रियकराच्या मृतदेहाजवळ धायमाेकलून रडत माझ्या भावाने त्याची हत्या केल्याचे सांगितले. 


या प्रकरणातील मयत प्रदीप व गावातील मुलगी दाेघेही एकाच वर्गात शिकत हाेते. तरुणीच्या भावाने मित्रांच्या मदतीने प्रदीपला शाळेबाहेर बाेलावत नजीकच्या एका शेतात नेऊन त्याची हत्या केली. याप्रकरणी पाेलिसांनी अाराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संबंधित तरुणीची रवानगी सेफ हाऊसमध्ये केली अाहे. या प्रकरणातील सर्व अाराेपी फरार झाले अाहेत. 

 

तरुणी म्हणाली- माझ्या भावाने प्रदीपला मारले
या प्रकरणात घटनास्थळी भेट देऊन पाेलिस अधीक्षक कमलदीप यांनी संबंधित तरुणीची भेट घेतली. त्यात माझ्या वर्गात शिकणाऱ्या गाैरव नावाच्या मुलाने मला सांगितले की, तुझ्या भावाने प्रदीप मारले. मी गाैरव, प्रदीप व माझ्या भावाला एकाच दुचाकीवर जाताना पाहिले, असे तिने पाेलिसांना सांगितले.

 

तरुणीच्या नातेवाइकांनी युवकाची गाेळ्या झाडून केली हत्या

खरखाैदा (साेनीपत) - दुसरी घटना मटिंडू या गावात मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. त्यात २१वर्षीय तरुणाची तरुणीच्या नातेवाइकांनी गाेळ्या झाडून हत्या केली. दीपक असे त्याचे नाव अाहे. गावातील एक तरुणी माझ्या मुलाशी माेबाइलवर बाेलत असे. या कारणामुळे तिचे नातेवाईक नाराज हाेते. त्यातून त्यांनी मंगळवारी माझ्या मुलाची हत्या केली, असे दीपकच्या वडिलांनी पाेलिसांना सांगितले. दीपक हा शेती पाहायचा व गाय-बैलांच्या गाेठ्यातच राहायचा. नेहमीप्रमाणे सर्व कामे अाटाेपून ताे नऊ वाजता घरून शेतात निघून गेला हाेता. मात्र, सकाळी जेव्हा मी गुरांना चारा टाकण्यासाठी शेतात गेलाे, तेव्हा गाेठ्यात मला माझा मुलगा मृतावस्थेत पडलेला दिसला. गाेळी झाडून त्याची हत्या करण्यात अाली हाेती, असेही दीपकचे वडील समुंदर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...