आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरा- सहा मित्रांनी मिळून गावातील एका अल्पवयीन तरूणीवर सामूहीक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडिता वेदनेने तडपत होती, सोडून देण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु, तिच्यावर कोणालचा दया आली नाही. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी या दुष्कर्माचा व्हिडिओ देखील बनवला. आरडा-ओरड केली तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत दुष्कर्म केले आणि नंतर हा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील कृष्णगड येथे घडली आहे.
एक आरोपी अठकेत...
गटनेच्या सात दिवसांनतर देखील मुख्य आरोपी राकेश यादवसह पांच अभियुक्त फरार आहेत. एक आरोपी कृष्ण यादव याला अटक करण्यात आली आहे. सामुहिक बलात्काराप्रती लोकांमध्ये तिव्र संताप आहे. पोलिसांना या घटनेचा व्हिडिओ हाती लागला आहे, त्या आधारावार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. बुधवारी पीडितेने मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला आहे.
पीडितेनो कोर्टात सांगितली आपबीती...
31 जानेवारीच्या सायंकाळी पीडित तरूणी शेतात गेली होती. या दरम्यान गावातील सहा तरूणांनी तीला पकडले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. अल्पवयीन तरूणी मदतीसाठी ओरडत राहिली, सोडून देण्यासाठी विनवण्या करू लागली तरी नराधमांना तिच्यावर दया आली नाही. त्यांनी तिच्यवार दुष्कर्म केले आणि तिचा मोबाईल देखील हिसकावून घेतला.
घटनेच्या दिवशी अल्पवयीन पीडित तरूणी छोट्या भावासोबत होती. तिच्या आईसह इतर भावंड वडिलांकडे कोलकाता येथे गेले होते. नंतर वडिल आई गावी परतल्यानंतर तिने त्यांना घडलेला प्रकाराविषयी सांगितले. 6 फेब्रुवारीला आरा पोलिसा ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
राकेशने केला होता रेप, राहुलने बनवला व्हिडिओ...
पीडितेच्या जबाबवरून दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये पदमिनियां गावातील राकेश यादव उर्फ छोटू, मिथलेश यादव, राहुल यादव, गुड्डू यादव, सुरेमन यादव आमि कृष्णा यादव यांना आरोपी बनवण्यात आले आहे. महिला पोलिस अधिकारी पूनम कुमारी यांनी सांगितले की, आरोपींवर तीन गंभीर कलम लावण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा त्या दिवशी नेमके काय घडले....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.