आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादेत जन्मली ASIA खंडातील सर्वात हल्की, छोटी मुलगी; 25 व्या आठवड्यातच जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - हैदराबादच्या रेनबो रुग्णालयात आशिया खंडातील सर्वात लहान आणि हल्की मुलगी जन्माला येऊन रेकॉर्ड करू इच्छित आहे. फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या या तान्हुल्या मुलीचे वजन फक्त 375 ग्रॅम आहे. ही मुलगी आशिया खंडात जन्मलेली सर्वात लहान आणि हल्की असल्याचा दावा केला जात आहे. तिची लांबी सुद्धा फक्त 20 सेमी आहे. रेनबो रुग्णालयात डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने सांगितल्याप्रमाणे, तिचा जन्म अवघ्या 25 व्या आठवड्यातच झाला आहे. 


सरासरी गर्भधारणेच्या 36 ते 40 आठवड्यानंतर बाळ जन्माला येतो. त्यापूर्वी जन्म घेणाऱ्या अर्भकाला प्रीम मॅच्योर (अपरिपक्व) म्हटले जाते. समय पूर्ण होण्याआधीच जन्म घेणाऱ्या बाळांचे अंग पूर्णपणे विकसित होत नाही. तसेच त्यांच्या जिवंत राहण्याची शक्यता देखील फार कमी असते. हैदराबादेत हे बाळ फक्त 25 व्या आठवड्यात जन्मले. त्यामुळे, तिचे जिवंत वाचणे एक चमत्कार मानले जात आहे. 27 फेब्रुवारी जन्मलेली ही मुलगी आता अडीच किलोंची झाली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला चेरी असे नाव दिले आहे. यापूर्वी जगातील सर्वात लहान आणि हलक्या मुलीचा जन्म झाला. तिचे वजन फक्त 229 ग्रॅम आणि उंची फक्त 8.5 इंच होते. 

बातम्या आणखी आहेत...