आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या एक दिवस आधीत प्रेमी युगूल पळाले, हे होते कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बाल विवाह रोखण्यासाठी समाज सुरक्षा विभागाची कवायत सुरू आहे. बाल विवाहाच्या प्रकरणात पालकच दोषी असल्याचे अनेक आढळून आले आहेत. हे पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे जबरदस्ती लग्न लावून देतात. परंतु, यथे एक असे प्रकरण समोर आले आहेत, ज्यात लग्न होत असलेले जोडपे लग्नाच्या एक दिवस आधीच पळून गेले. परंतु, नंतर पोलिसांनी दोघांना पकडले देखील.
 

दोघांना आला होता अंदाज...
समाज सुरक्षा विभागाला एका 19 वर्षाच्या तरूणाचे लग्न 16 वर्षाच्या मुलीशी होत असल्याची माहिती मिळाली होती. याच महितीच्या आधारावर त्यांची एक टीम लग्न मंडतपात पोहोचली परंतु, तेथे केवळ वऱ्हाडी मंडळीच होते. चौकशी केल्यानंतर कळाले की, नवरदेव आणि नवरी एक दिवस आधीच लग्न मंडापातून पळून गेले होते. ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी आपल्या कुटुंबाकडे लग्न लावून देण्यायची मागणी केली होती. असे न केल्या दोघेही आत्महत्या करू असा इशारा त्यांनी कुटुबीयांना दिला होता. यामुळे मजबूरीने कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान दोघांना कळाले की, या लग्नविषयी कोणतीरी तक्रार केली आहे. हे लग्न होऊ देण्यात येणार नाही, त्यामुळे दोघेही एक दिवस आधीच लग्न मंडपातून फरार झाले.
 

पोलिसांनी केली अटक...
समाज सुरक्षा विभाग दोन्ही कुटुंबांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या तीन तासात दोघांना पकडले. तरूणीला स्पेशल होम फॉर गर्ल्समध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांची विचारपूस केल्यानंतर दोघांनी मंदीरात लग्न केले असल्याची माहिती मिळाली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...