आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्र संरक्षणासाठी गुगलची नोकरी सोडून बृजने मित्रासोबत बनवले सॉफ्टवेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- राजस्थानचे बृजभूषण यांनी गुगलची नोकरी सोडून मित्र रविकांत सिंह यांना सोबत घेत व्याघ्र संरक्षणावर काम सुरू केले आहे.  दोघांनी एक सॉफ्टवेअर तयार केले असून त्याद्वारे आसाममधील काझीरंगा,  भोपाळचे रातापाणी आणि उत्तराखंडमधील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांवर विशेषत: वाघांवर नजर ठेवली जात आहे.   


शिकाऱ्यांचीही हालचाल या सॉफ्टवेअरद्वारे टिपली जात आहे.  २०१० मध्ये त्यांना ही कल्पना सुचली. रेडिअो कॉलरच्या माध्यमातूनच वाघांवर लक्ष ठेवण्याची पद्धत त्यांना योग्य वाटली नाही. दोघांनी नोकरी सोडून जंगलांमध्ये ७५ चौरस किमीपर्यंत लक्ष ठेवता येईल असे वॉच टॉवर उभारले. सॉफ्टवेअर तयार करून सर्व टॉवरला याच्याशी जोडले. टॉवरवरून माहिती सॉफ्टवेअरला पाठवली जाते.  सर्व डेटा सुरक्षित राहतो. या आणि जर्मनीच्या एका सॉफ्टवेअरचे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण आयोगासमोर सादरीकरण झाले. जर्मन सॉफ्टवेअरला रवी-बृजच्या सॉफ्टवेअरने मागे टाकले.


मोबाइलवर येतो संदेश  
प्राणी, व्यक्तींसंदर्भातील संशयास्पद हालचाली होताच सॉफ्टवेअरद्वारे वन अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संदेश पोहोचतो. वन संरक्षणावर नॅशनल जिअोग्राफिकने एक स्पर्धा ठेवली होती. ५५ देशांच्या ३०० लोकांमध्ये रवी-बृज यांच्या प्रणालीला पहिले स्थान मिळाले.

बातम्या आणखी आहेत...