आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आता दरवर्षी जावेद अख्तर साहित्य सन्मान पुरस्कार दिला जाईल. याची सुरुवात या वर्षीपासून होत आहे. पद्मश्री व पद्मविभूषणने सन्मानित गीतकार, शायर, पटकथा लेखक जावेद अख्तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. विविध यश आणि सन्मानासह मुंबईतील झगमगाटाच्या चित्रपट जगतात जावेद अख्तर यांचे असणे एक नेक व्यक्तिरेखा असण्यासारखे आहे.
सध्याच्या स्थितीत ते भारताचे बौद्धिक भांडवल आहेत. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी एक लाख रुपये व प्रशस्तिपत्रासह सन्मान केला जाईल, असे रूपांकनचे शरद डोसी व प्रवीण अग्रवाल (महू) यांनी सांगितले. पहिला जावेद अख्तर साहित्य सन्मान प्रसिद्ध गीतकार व शायर सूर्यभानू गुप्त यांना दिला जाईल. सूर्यभानू गुप्त हिंदी गझल परंपरेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रमुख साक्षीदार आहेत. दैनिक भास्कर, रूपांकन व मंजुल पब्लिकेशनच्या संयुक्त आयोजनात या वर्षीचा सन्मान भोपाळमध्ये २५ मार्चला प्रदान केला जाईल. तीन आयोजकांशी जावेद अख्तर यांचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्नेहसंबंध राहिलेला आहे. जावेद अख्तर यांचे चित्रपट व साहित्यात अविस्मरणीय योगदान, त्यांचे तत्त्वज्ञानी व्यक्तिमत्त्व, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रत्येक प्रकारच्या अंधश्रद्धेविरुद्ध त्यांचा ठोस व स्पष्ट दृष्टिकोन, विश्वासू समाजासोबत सुंदर जग तयार करण्याच्या प्रयत्नांना सलाम करत यास सन्मानास त्यांचे नाव देण्याचे ठरले.
यानिमित्त प्रसिद्ध शायर जाँ निसार अख्तर यांचे पुस्तक ‘आवाज दो हम एक हैं’ याचे प्रकाशन होणार आहे. सोहळ्यात मध्य प्रदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव बसंत प्रतापसिंह, गीतकार व शायर सूर्यभानू गुप्त यांना सन्मानित करतील. समारंभास जावेद अख्तर, शबाना आझमी व फरहान अख्तर यांच्यासह दानिशमंद व अदीब अख्तर, कुटुंबाच्या सहाव्या पिढीच्या वारस व फरहान अख्तर यांची मुलगी शाकिया अख्तर उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.