आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ - समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यांना मोठा झटका दिला आहे. नरेश अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 2 एप्रिल रोजी अग्रवाल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. समाजवादी पक्षाने अग्रवाल यांना पुन्हा उमेदवारी देण्याऐवजी उत्तर प्रदेशमधून जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली होती. अग्रवाल यांनी सोमवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, पक्षाचे प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. नरेश अग्रवाल यांनी आरोप केला, की सपामध्ये चित्रपटात काम करणाऱ्यांना तिकीट दिले जाते परंतू पक्षात काम करणाऱ्याचे तिकीट कापले जाते.
मुलायमसिंह-रामगोपाल यादवांच्या संपर्कात राहाणार
- नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव आणि जया बच्चन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'चित्रपटांत नाचणाऱ्यांसोबत माझी तुलना केली गेली. मुलायमसिंह आणि रामगोपाल यादव यांच्या संपर्कात राहील. मात्र यापुढे सपाचा सदस्य राहाणार नाही. कोणत्याही अटी-शर्थी न ठेवता भाजपमध्ये प्रवेश करत आहे.'
- नरेश अग्रवाल म्हणाले, 'मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. माझा विचार आहे की राष्ट्रीय पक्षात राहिलो नाही तर राष्ट्राची सेवा करता येणार नाही. त्यासाठी मी हा निर्णय घेत आहे.'
- 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालो आहे. सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावरुन पंतप्रधानांच्या सोबत असले पाहिजे.'
- भाजप प्रवेश केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, ' मी वरिष्ठ नेता असताना, माझे राज्यसभेचे तिकीट चित्रपटांत नाचणाऱ्यांसाठी कापले गेले.'
अग्रवाल यांचा मुलगा नितीन अग्रवाल हरदोई येथून आमदार आहे. अग्रवाल म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमचा भाजपला पाठिंबा राहिल.
राज्यसभा निवडणुकीवर कसा परिणाम होणार?
- राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने जया बच्चन यांना मैदानात उतरवले आहे. 47 आमदारांची सपा 37 मतांसह जया यांना सहजरित्या राज्यसभेवर पाठवू शकते. उर्वरित 10 मतांसह ते बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत.
- मात्र नरेश अग्रवाल यांच्यासह त्यांच्या मुलानेही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सपाकडे 9 मतेच शिल्लक आहेत.
- बसपाच्या वतीने भीमराव आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जात आहे. त्यासाठी त्यांचे समीकरण सुरु होते. बसपाकडे 19, सपा-10, काँग्रेस-7, राष्ट्रीय लोकदल-1 असे 37 मते मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे.
- नितीन अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाने बसपाचा डाव उधळला जाऊ शकतो. नरेश अग्रवाल यांनी स्पष्ट सांगितले आहे की राज्यसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा भाजपला पाठिंबा देईल.
कोण आहेत नरेश अग्रवाल?
- नरेश अग्रवाल यांच्या राजकारणाची सुरुवात 1980 मध्ये झाली. हरदोई येथून ते काँग्रेसच्या तिकीटावर सर्वप्रथम आमदार झाले. त्यानंतर 7 वेळा विविध पक्षांतून ते आमदार आणि दोन वेळा राज्यसभा सदस्य झाले.
- अग्रवाल यांनी काँग्रेस, लोकतांत्रिक काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि परत सपा असा प्रवास करत आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.