आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू; दुबईतील प्रसारमाध्यमांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने नव्हे तर बाथटबमध्ये बुडून झाल्याची माहिती उघड झाली. मात्र ती कशी बुडाली हे गुलदस्त्यातच अाहे. दरम्यान, श्रीदेवीच्या रक्तात दारूचे अंश अाढळल्याचा दावा दुबईतील माध्यमांनी केला. नशेतच तिचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज अाहे. पाेलिस अहवालात मात्र तिच्या रक्तात दारू असल्याची पुष्टी नाही. मात्र सर्व पुराव्यांच्या अाधारे पाेलिस श्रीदेवीच्या मृत्यूची सखाेल चाैकशी करत अाहेत. अखेरच्या क्षणी श्रीदेवीसाेबत नेमके काय झाले त्याचा अहवाल सरकारी वकिलांकडे साेपवला आहे. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल व इतर दस्तएेवजांवर दुबईतील सरकारी वकिलांचे समाधान झालेले नाही. त्यांनी श्रीदेवी थांबलेल्या हाॅटेलकडून सीसीटीव्ही फुटेज मागितले अाहे. तसेच पाेलिसांना सखाेल चाैकशी करण्याचे अादेशही दिले अाहेत. त्यांच्या मंजुरीनंतरच श्रीदेवीचे पार्थिव भारतात अाणता येईल. याच दरम्यान मुंबईतील एका वकिलाने मुख्यमंत्र्यांना ई-मेल करून श्रीदेवीचे पार्थिव भारतात अाणल्यानंतर शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली अाहे.

 
 पार्थिव अाज मिळण्याची अाशा

कायदेशीर कारवाई पूर्ण न हाेऊ शकल्याने साेमवारीही श्रीदेवीचे पार्थिव तिच्या नातेवाइकांना मिळू शकले नाही. मंगळवारी दुपारपर्यंत तिच्या शरीरावर लेप लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळपर्यंत पार्थिव कुटुंबीयांकडे साेपवले जाऊ शकते. मात्र इकडे मुंबईत तिच्या वर्साेवातील बंगल्यासमाेर रविवारपासूनच चाहत्यांनी गर्दी केलेली अाहे. घरासमाेर श्रीदेवीला श्रद्धांजली वाहणारे फलकही उभारण्यात अाले अाहेत. तिचे पार्थिव साेमवारी तरी मुंबईत येईल, अशी त्यांना अाशा हाेती, मात्र ती फाेल ठरली.


अमरसिंह म्हणाले, श्रीदेवी दारू पीत नव्हती 
खासदार अमरसिंह यांनी फाॅरेन्सिक अहवालावरच शंका उपस्थित केल्या अाहेत. श्रीदेवी कधीच दारू पीत नव्हती. कधी तरी ती वाइन पीत हाेती, अशी माहिती त्यांनी दिली.   


बाेनी कपूरची चार तास चाैकशी
 अखेरच्या क्षणी श्रीदेवीसाेबत काय झाले हाेते, याबाबत दुबई पाेलिसांनी बाेनी कपूर यांच्याकडे तब्बल चार तास चाैकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जबाबाचे शूटिंग करण्यात अाले अाहे. तसेच श्रीदेवीला रुग्णालयात नेणारे तीन इतर लाेकांचे, डाॅक्टरांचे व पाच कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात अाले. 

 

... म्हणून बाथरूममध्ये गेली हाेती श्रीदेवी
माध्यमांनुसार, पती बाेनी कपूर अाधी मुलीला घेऊन मुंबईत अाले, मात्र श्रीदेवीला सरप्राइज देण्यासाठी ते शनिवारी पुन्हा दुबईत गेले हाेते. सायंकाळी ५.३० वाजता हाॅटेलमध्ये जाऊन त्यांनी श्रीदेवीशी गप्पा मारल्या व डिनरसाठी तयार हाेण्यास सांगितले. त्यामुळे श्रीदेवी बाथरूममध्ये गेली. मात्र तिथेच बाथटबमध्ये ती काेसळली.

 

पोलिस म्हणले- अपघाताने बुडून मृत्यू 
- दुबई पोलिसांनी म्हटले आहे की श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे. अपघाताने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. हेच फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 
- पोलिसांनी श्रीदेवी मृत्यू प्रकरणाची कायदेशीर कारवाई दुबई प्रॉसिक्यूशनकडे सोपवली आहे. 

 

लाइव्ह अपडेट्स 

- खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. बेशुद्धीत श्रीदेवी यांना कार्डिएक अरेस्ट आला. 
- गल्फ न्यूजने म्हटले आहे की श्रीदेवी यांच्या रक्तात अल्कोहलचा अंश सापडला आहे. 
 

हे सेलेब्स पोहोचले अनिल कपूरच्या घरी 
- मुंबईत अभिनेता अनिल कपूर यांच्या निवासस्थानी येऊन अनेक सेलेब्सने कपूर कुटुंबियांचे सांत्वन केले. अनिल कपूर हे बोनी कपूर यांचे बंधू आहेत. तर श्रीदेवी त्यांची वहिनी होती. 
- सोमवारी दुपारी 2 वाजता माधुरी दीक्षित अनिल कपूरच्या घरी पोहोचली.  त्याआधी करण जोहर, मनीष मल्होत्रा हे अनिल यांच्या घरी आले होते. 
- शबाना आझमी, करण जोहर यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. शबाना यांनी 2 मार्चला आयोजित केलेली होळीची पार्टी रद्द केली आहे. 
- कोरिओग्राफर सरोज खान, फरहान अख्तर त्याची आई हनी इरानी यांच्यासोबत अनिल यांच्या घरी पोहोचला होता. 
- श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी साऊथचे सुपरस्टार रजनीकांत मुंबईत पोहोचले आहेत. 

 

शनिवारी रात्री दुबईतील हॉटेलमध्ये काय झाले? 
- कपूर कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या हवाल्याने खलीज टाइम्सने म्हटले आहे, की बोनी कपूर लग्न सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परतले होते. 24 फेब्रुवारीला ते पुन्हा दुबईत आले. सायंकाळी साधारण 5.30 वाजता जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलमध्ये ते पोहोचले. येथेच श्रीदेवी थांबलेल्या होत्या. बोनी हे श्रीदेवी यांना सरप्राइज डीनरला घेऊन जाणार होते. 
- बोनी आणि श्रीदेवी यांना उठवले. दोघांमध्ये 15 मिनीट बोलणे झाले. त्यानंतर श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्या. जेव्हा 15 मिनिट होऊनही श्रीदेवी बाहेर आल्यानाही तेव्हा बोनी यांनी बाथरुमचे दार वाजवले तर आतून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यांनी धक्का देऊन दार उघडले तर आतमध्ये श्रीदेवी बेशुद्ध आवस्थेत बाथटबमध्ये पडलेल्या होत्या. 
- बोनी यांनी त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या मित्राला फोन केला. साधारण 9 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. 
- पोलिस आणि डॉक्टर हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केले. 

 

 

मुंबईत अंत्ययात्रेची तयारी पूर्ण, पांढऱ्या रंगाच्या असतील सर्व वस्तू 
- श्रीदेवी यांचे पार्थिव अद्याप भारतात आलेले नाही. मुंबईत अंत्ययात्रेची तयारी सुरु आहे. 
- श्रीदेवी यांना पांढरा रंग खूप आवडत होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह, काही निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते की माझ्या अखेरच्या क्षणी सर्व वस्तू या पांढऱ्या राहातील. त्यामुळेच अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना सर्व वस्तू या पांढऱ्या रंगाच्या असतील याकडे लक्ष दिले जात आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुबईत येथे आहे श्रीदेवी यांचे पार्थिव शरीर...

बातम्या आणखी आहेत...