आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगासागर प्लास्टिकमुक्त झोन करण्याची पश्चिम बंगाल सरकारची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर बेट (पश्चिम बंगाल)- पश्चिम बंगाल सरकारने गंगासागर या तीर्थक्षेत्राला प्लास्टिकमुक्त झोन करण्याची घोषणा केली आहे. येथे वार्षिक गंगासागर मेळ्याचे आयोजन केले जाते. अविघटनशील कचरा येथे गंगेच्या पाण्यात मिसळू नये या दिशेने आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. हजारो भाविक दरवर्षी येथे येतात. गंगासागर पंचायत समितीने प्लास्टिकमुक्त सागर बेटाची अंमलबजावणी करावी, असे सरकारने म्हटले आहे. हा परिसर संपूर्ण प्लास्टिकमुक्त होण्यासाठी अद्याप काही काळ द्यावा लागेल, असे समितीने म्हटले आहे.  


कोलकात्यापासून १३० किलोमीटरवर त्रिकोणी सागर बेट आहे. गंगेच्या प्रवाहामुळे हे बेट मुख्य भूमीपासून वेगळे दिसते. या बेटाच्या तिसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे. मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये लाखो हिंदू भाविक येथे दर्शनासाठी येतात. गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी या स्थानाचे महत्त्व आहे. येथे ५ घाट असून तिथे अविघटनशील कचऱ्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. भाविक व स्थानिकांना यासंबंधी पत्रके वाटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

 

गंगासागर मेळ्यानिमित्त भाविकांचे आगमन सुरू
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात गंगासागर मेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र नंतरची गर्दी टाळण्यासाठी अनेक भाविक डिसेंबरअखेरीस येथे येण्यास सुरुवात होते. सध्या भाविकांचे आगमन सुरू झाले आहे. कपिलमुनी मंदिरातदेखील मकर संक्रांतीनिमित्त भाविकांची रीघ असते.

बातम्या आणखी आहेत...