आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story About Great Maratha King Shivaji Maharaj, He Eat Only Once In A Day Like Yogi

दिवसातून एकदाच जेवण, तरीही चपळ; अशी अनुकरणीय आहे छत्रपतींची गुणसंपदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार, विहार, विचार, कृती, गुणवैशिष्ट्ये सर्वच अनुकरणीय आहेत. शत्रू आपल्या बरोबर विराट सैन्यासह लवाजमा घेऊन येत असे. शत्रूच्या सैन्यात, खाणे, पिणे, नाचगाणे असा सर्व विलासी थाट असायचा. तर शिवरायांच्या सैन्यात खाण्यावर

नियंत्रण तर होतेच मद्य पिणे, गाणे, नाचणे यावर पूर्णपणे बंदी होती.

> आहार हि युद्धातील दुर्लक्षित न करण्याची बाब आहे. हे शिवरायांनी चांगले ओळखले होते. पोटात अन्न नसेल तर सैन्य लढणार कसे? पराक्रम करून विजय मिळविणार कसे? म्हणून शिवराय आहाराच्या बाबतीत अगदी काटेकोरपणे वागत. जसे सैन्याच्या बाबतीत तसे
स्वतःच्या बाबतीतही काटेकोर असत.

> ज्यांनी राजांना पाहिले त्यांच्या हवाल्यावरून एस्केलियट या एका युरोपियन वकिलाने राजांचे वर्णन केले आहे. तो म्हणतो- मध्यम उंची, प्रमाणबद्ध शरीर, राजा कामात क्रियाशी, नजरेत तीक्ष्ण आणि वर्णाने इतरांपेक्षा गोरे असून नेहमी स्मित हास्य करत बोलतात.
> दुसरा एक युरोपियन वकील थेवनॉटच्या मते, राजे मध्यम उंचीचे, पिवळट तपकिरी वर्णाचे होते., ते लिहितात, शिवाजी राजांचे डोळे अतिशय तेजस्वी असून त्यातून श्रेष्ठ बुद्धिमत्त जाणवते. ते नेहमी दिवसातून एकदाच जेवतात आणि त्यांचे आरोग्य चांगले आहे.

> कॉस्मो दा गार्डा या वकिलाने वरील वर्णनास पुष्टी दिली आहे. तो लिहितो, "राजे कामात जलद, चालीत उत्साही होते. त्यांचा चेहरा स्वच्छ व वर्ण गौर होता. विशेषत: काळेभारे मोठमोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते की त्यातून तेजस्वी किरणे बाहेर पडताहेत असे वाटते. यात त्यांची चलाख, स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ता भरच टाकते." 

 

पुूढे वाचा... छत्रपति शिवरायांची अनुकरणीय गुणसंपदा...  

बातम्या आणखी आहेत...